17 जानेवारी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळणे
बेळगाव—belgavkar : सीमाभागातील 865 गावातील नागरिकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षातून अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. याबाबत पोटशूळ उठलेल्या कन्नड संघटनांनी या सुविधेला विरोध केला आहे. बेळगाव प्रशासनाने समिती नेत्यांना नोटीस पाठवणार असल्याचे म्हटले आहे. या घटनेचा निषेध तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला.
भाषावार प्रांतरचनेवेळी झालेल्या अन्यायाविरोधातील आंदोलनात हुतात्मा झालेल्यांना 17 जानेवारी रोजी कंग्राळी खुर्दमध्ये अभिवादन करण्यासह व्यापाऱ्यांवर कन्नड फलकाची सक्ती आणि वैद्यकीय मदतीवर प्रशासनाने घेतलेल्या आक्षेपांविरोधात 25 जानेवारीनंतर मोर्चा काढण्याचा निर्धार तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. संघटना बळकटीसाठी गावपातळीवर जागृती करण्यावरही चर्चा झाली.
तालुका म. ए. समितीची बैठक शनिवारी मराठा मंदिर सभागृहात माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत 17 जानेवारी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळणे, प्रशासनाकडून होत असलेल्या कानडीसक्तीचा निषेध करण्याबाबत चर्चा करण्यात आली. माजी आमदार किणेकर म्हणाले, सीमाभाग महाराष्ट्रात जाण्यासाठी 1956 मध्ये हौतात्म्य पत्करलेल्यांना अभिवादन करण्यासाठी सर्वांनी 17 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता कंग्राळी खुर्दमध्ये जमावे. या कार्यक्रमानंतर शहरातील व्यापाऱ्यांना प्रशासन कन्नड फलकांसाठी धमकावत आहे. त्याविरोधात आंदोलनाची रुपरेषा ठरणार आहे. आम्ही 25 जानेवारीपर्यंत प्रशासनाला मुदत देऊन कानडीकरणाचा प्रकार रोखावा, अशी विनंती करून मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार या मोर्चासाठी गावोगावी जनजागृती हाती घेण्यात येणार आहे. संघटना बळकटीसाठी गावपातळीवर नेत्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मनोज पावशे म्हणाले, महाराष्ट्राची आरोग्य सेवा सीमावासियांना मिळणार असल्यामुळे मराठी जनतेला दडपण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला आपण चोख प्रत्युत्तर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. एपीएमसी माजी सदस्य आर. के. पाटील म्हणाले, हुतात्म्यांनी बलिदान देऊन महाराष्ट्रात समाविष्ट होण्याचा निर्धार केला होता. गेल्या 67 वर्षांपासून आम्ही त्यांना अभिवादन करून त्यांचा निर्धार कायम ठेवत आलो आहोत. सध्या प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात कन्नडसक्ती करण्यात येत आहे. मराठी माणसांना डिवचण्याचा वारंवार प्रयत्न होत आहे. याविरोधात सर्वांनी संघटितपणे लढा देऊया. यावेळी सदस्य, नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum taluka mes meeting kannada belgavkar Belgaum belgav belagavi belgaum
Belgaum taluka mes meeting kannada belgavkar
Belgaum taluka mes meeting kannada belgavkar
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements