बेळगाव—belgavkar : 2 आंतरराज्य चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात बेळगाव जिल्हा पोलीस दलाला यश आले आहे. त्यांच्याकडून तब्बल 15 लाख रुपये किंमतीचे 300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल, नेसरगी आदी ठिकाणी झालेल्या चोऱ्या आणि घरफोडींमुळे एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त एसपी एम. वेणुगोपाल आणि डीवायएसपी आर. बी. बसरगी आणि रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली बैलहोंगल सीपीआय व्ही. बी. सालीमठ यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक रचण्यात आले होते. या पथकाने वैज्ञानिक तपास साधनांचा वापर करून दोन आरोपींना महाराष्ट्र राज्यात अटक करण्यात आली आहे (belgaum police arrested two thieves).
याबाबत पत्रकारांना माहिती देताना एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले की, दीपक सुदेश पवार (वय 22) आणि राहुल गंगाधर जाधव (वय 21, दोघेही राहणार करत मनस्कुल झोपडपट्टी, पोस्ट कुंभार पिंपळगाव, तालुका गुणसंगी, जिल्हा जालना, महाराष्ट्र) यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल, नेसरगी, हुक्केरी आणि संकेश्वर पोलीस ठाण्यात चोरीचे 10 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून 15 लाख रुपयांचे 300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. यातील आणखी एक सहआरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे, असे एसपी गुळेद यांनी सांगितले.
belgaum police arrested two thieves
बेळगाव
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements