महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक
बेळगाव—belgavkar : महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक १५ फेब्रुवारीला होणार असून त्याच दिवशी सकाळी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाईल, अशी माहिती आमदार अभय पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली ते म्हणाले, महानगर भाजप अध्यक्षा गीता सुतार, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके आणि माझ्या नेतृत्वाखाली भाजप शहर कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यानंतर कोअर कमिटीच्या बैठकीत नावे निश्चित करण्यात येणार आहेत.
ही नावे भाजप प्रदेशाध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे, उमेदवारांची नावे निवडणुकीच्या दिवशीच जाहीर करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेत भाजपाकडे स्पष्ट बहुमत आहे. महापौरपद अनुसुचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. या प्रवर्गात भाजपमध्ये 2 नगरसेविका आहेत. सविता कांबळे आणि लक्ष्मी राठोड यांच्यात चुरस आहे. तर उपमहापौरपद खुले आहे. त्यामुळे, भाजपच्या बैठकीतच या नावांवर निर्णय होणार आहे, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.
Belgaum Mayor Election MLA Abhay Patil belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Mayor Election MLA Abhay Patil
Belgaum Mayor Election MLA Abhay Patil
Belgaum Mayor Election MLA Abhay Patil
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310