दुचाकीसह 100 फूट उंच कड्यावरून खाली दरीत कोसळला Chikhale Falls
पश्चिम घाटातील निसर्गरम्य झाडीत कर्नाटकातून गोव्याच्या हद्दीत फेसाळत कोसळणारा चिखले धबधबा
बेळगाव—belgavkar : खानापूर : खानापूर तालुक्याच्या पश्चिमेला गोवा-खानापूर हद्दीतील घनदाट जंगलात असलेल्या चिखले धबधब्याच्या दरीत पडलेल्या बेळगावच्या स्ट्रीट रोड कॅम्पमधील युवकाला वाचविण्यात यश आले आहे. चिखले येथील घनदाट जंगलात असलेला हा धबधबा पाहण्यासाठी बेळगाव शहरातील स्ट्रीट रोड कॅम्प येथील दर्शन, विनय आणि विनायक हे तिघे युवक सोमवारी दुपारी अडीच वाजता गेले होते.
त्यावेळी विनायक सुनील बुथुलकर (वय 20) हा युवक धबधब्याच्या वरच्या बाजूने दुचाकीवरून जाताना दुचाकीसह 100 फूट उंच कड्यावरून खाली दरीत कोसळला. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या मित्रांनी खानापूर पोलिसांना संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. जांबोटी येथील पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन चिखले येथील ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले.
काही ग्रामथांसह पोलिसांनी या खोल दरीत उतरून विनायकला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले. विनायक याच्या चेहऱ्याला व पायाला जखम झाली असून सुदैवाने तो बचावला आहे. खानापूरचे पोलीस निरीक्षक रामचंद्र नायक यांच्या मार्गदर्शनाखाली जांबोटी पोलीस उपकेंद्रातील जगदीश काद्रोळी, वासू पारसेकर व चिखले येथील संजय पाटील व ग्रामस्थांनी बचावकार्यात सहकार्य केले आहे. विष्णू यशवंत पाटील, बाळू गावडे,राजू मडीवाळ, व्यंकटेश तेलंगा यांनी युवकाला दरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले. चिखले हा गाव खानापूर तालुक्याच्या हद्दीतील असून या दरीतील खालील भाग हा गोवा हद्दीत येत असल्याने गोवा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. गोवा पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
Chikhale Falls is a popular tourist attraction located near Khanapur in the Belgaum district of Karnataka, India. The falls are known for their scenic beauty and are a great spot for nature lovers and adventurers. Visitors can enjoy the lush greenery surrounding the falls and the refreshing water cascading down the rocks. It’s a picturesque destination for a day trip or a weekend getaway. It’s known for its scenic beauty and tranquil surroundings, making it a favorite spot for nature lovers and photographers. The waterfall is especially picturesque during the monsoon season when it’s at its fullest. Chikhale Falls is indeed located near Khanapur in the Belagavi (formerly Belgaum) district of Karnataka, India. It’s a picturesque waterfall nestled amidst lush greenery, offering visitors a serene and refreshing experience amidst nature.
Belgaum Khanapur Chikhale Falls Youth Fall Saved belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Khanapur Chikhale Falls Youth Fall Saved
Belgaum Khanapur Chikhale Falls Youth Fall Saved
Belgaum Khanapur Chikhale Falls Youth Fall Saved
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements