लाभार्थी शासकीय सुविधा आणि योजनांपासून वंचित
Karnataka Ration Card
बेळगाव—belgavkar : अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी नवीन रेशनकार्डला चालना देणार असल्याचे आश्वासन दिले होते (Food ,Civil Supplies and Consumer Affairs Department). मात्र अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे रेशनकार्डसाठी अर्ज केलेल्यांच्या पदरात केवळ निराशा पडली आहे. यामुळे लाभार्थ्यांना शासकीय सुविधा आणि योजनांपासून वंचित रहावे लागत आहे.
काँग्रेस सरकारने दिलेल्या गॅरंटी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्डची मागणी वाढली आहे. जिल्ह्यातून दीड लाख अर्ज दाखल झाले आहेत. मात्र सद्यस्थितीत अर्ज स्वीकृतीचे कामही थांबले आहे. त्यामुळे अर्ज करणाऱ्यांनाही रेशनकार्डसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अन्नभाग्य योजनेंतर्गत प्रतिव्यक्ती 5 किलो तांदूळ आणि 170 रुपये दिले जात आहेत. त्यामुळे अंत्योदय, बीपीएल आणि एपीएल रेशनकार्डची मागणी वाढू लागली आहे.
मागील 2 वर्षांत रेशनकार्डचे काम विस्कळीत झाले आहे. मध्यंतरी काही रेशनकार्डे वितरीत करण्यात आली. त्यानंतर पुन्हा या कामाला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे खात्याकडे तब्बल 2 लाखांहून अधिक अर्ज पडून आहेत. शिवाय नवीन अर्ज स्वीकृतीला मंजुरी दिल्यास पुन्हा अर्जांच्या संख्येत वाढ होणार आहे. अन्नभाग्य, गृहलक्ष्मी या दोन योजनांसाठी रेशनकार्ड अनिवार्य आहे. अन्नभाग्य योजनेंतर्गत मोफत रेशन त्याबरोबर प्रतिव्यक्ती 170 रुपये आणि गृहलक्ष्मी योजनेंतर्गत कुटुंबातील प्रमुख महिलेला मासिक 2000 रुपये दिले जात आहेत. त्यामुळे रेशन कार्डची मागणी वाढू लागली आहे. मात्र कित्येक दिवसांपासून काम ठप्प असल्याने लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
Belgaum Karnataka New Ration Card Pending belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum Karnataka New Ration Card Pending
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310