गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना टोल
टोलनाका गोव्याच्या एन्ट्री पॉईंटना, अंमलबजावणी कधी?
बेळगाव—belgavkar : गोवा राज्यात जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना आता टोल लागणार आहे. हा टोलनाका गोव्याच्या एन्ट्री पॉईंटना बसविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पत्रादेवी येथे तसेच गोवा-बेळगाव महामार्गावर दोन्ही राज्यांच्या सीमेवर असे दोन टोल नाके कार्यान्वित होणार आहेत. तसा निर्णय शनिवारी नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गोवा राज्य शासनाला दिले.
मात्र, हे टोलनाके कधी बसविणार तसेच कधीपासून टोल घेण्यास सुरुवात करणार याची अद्याप निश्चिती झालेली नाही. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे काही दिवसांपूर्वी गोवा येथील झुआरी पुलाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी अनेक नवीन प्रकल्प तसेच टोलबाबत चर्चा झाली. यावेळी गोवा राज्यात प्रवेश करणाऱ्या मार्गावर टोल नाके उभारण्यास मंजुरी देण्याचे मान्य केले होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी नवी दिल्लीत येथे वाहतूक मंत्रालयात आयोजित बैठकीला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच बैठकीला महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
या बैठकीतील चर्चेनुसार गोवा राज्याच्या एन्ट्री पॉईंटवर बांदा शहरानजीकच्या पत्रादेवी हद्दीजवळ तसेच कर्नाटक-गोवा राज्य सीमेवर एक टोल असे दोन टोलनाके बसवण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. गोवा राज्यात प्रवेश करण्यासाठी असलेल्या व संबंधित रस्ता प्रकल्पाचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर उर्वरित दोन ठिकाणीही टोल नाके सुरू केले जाणार आहेत. यामध्ये अनमोडमार्गे बेळगाव जाणाऱ्या महामार्गावर मोरे येथे व केरी येथे रस्ता प्रकल्पाची काम पूर्ण झाल्यानंतर टोल नाके सुरू होणार आहेत. त्यामुळे आता भविष्यात गोवा राज्यात प्रवेश करण्यासाठी टोल द्यावा लागणार, हे निश्चित आहे.
गोव्यालगतच्या राज्यांमधून प्रवेश करताना असलेल्या चार महामार्गांवर हा टोल भविष्यात द्यावा लागणार आहे. मुंबई-कन्याकुमारी, गोवा-हैदराबाद रस्ता कामासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला आहे. देशातील सगळ्यात मोठा असलेला विक्रमी खांबांचा मोपा लिंक रोड, बोरीपूल आणि वेस्टर्न बायपासला काणकोणपर्यंत मंजुरी देतानाच चोर्ला घाटातून साखळी ते खानापूरदरम्यान नव्या रस्ता प्रकल्पालाही गडकरी यांना हिरवा कंदील दिला आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबतही त्यांनी या बैठकीत आढावा घेत अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. जानेवारीअखेरपर्यंत हे टोल नाके सुरू करण्याचे सूतोवाच गडकरी यांनी झालेल्या बैठकीत केले होते. यामुळे गोव्यात प्रवेश करण्यासाठी टोल द्यावा लागणार हे निश्चित झाले आहे.
Belgaum Goa Entry Points Toll Goa belgavkar Belgaum belgav belagavi belgaum
Belgaum Goa Entry Points Toll Goa
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements