बेळगाव—belgavkar : प्रेमप्रकरणातून नावगे (ता. बेळगाव) गावात 30 ते 35 जणांच्या एका टोळक्याकडून तुफान दगडफेक करण्यात आली होती. हातात तलवार, रॉड, जांबिया आणि पिस्तूल धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली. नावगे येथील दगडफेक व वाहनांची तोडफोडप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी 9 जणांना अटक केली. गुरुवारी पाच आणि शुक्रवारी चार जणांना अटक केली. 1 जानेवारी रोजी सदर प्रकरण उघडकीस आल्यानंतर गावात तणाव वाढला आहे. त्यामुळे अद्याप नावगे व बहाद्दरवाडी गावात पोलिस बंदोबस्त कायम आहे.
बेळगाव ग्रामीण पोलिसांनी पहिल्यांदा गुरुवारी पाच जणांना अटक केली. हरिश्वरनाथ नारायण पाटील (वय 24, रा. बहाद्दरवाडी), भरमाणी बाळू नायक (वय 24, रा. बहाद्दरवाडी), संतोष गोविंद देवतगी (वय 23, रा. उद्यमबाग, बेळगाव), सुनील गोविंद देवतगी (वय 26, रा. उद्यमबाग, बेळगाव) व नागराज तुकाराम हजेरी (वय 25, रा. वडगाव, बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत.
तर शुक्रवारी आणखी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. दीपक रायप्पा दासप्पण्णावर (वय 21, रा. काकती), जोतिबा रामा बेळवटकर (वय 26, रा. बहाद्दरवाडी), जोतिबा लक्ष्मण मुळीक (वय 28, रा. बहाद्दरवाडी), विठ्ठल दुर्गाप्पा संजिमनी (वय 21, रा. तीर्थकुंडे, ता. खानापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयिताची नावे आहेत. प्रेमप्रकरणातून नावगे (ता. बेळगाव) गावात 30 ते 35 जणांच्या एका टोळक्याकडून तुफान दगडफेक करण्यात आली होती. हातात तलवार, रॉड, जांबिया आणि पिस्तूल धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली. चारपेक्षा अधिक घरांवर तुफान दगडफेक करून गृहोपयोगी साहित्याची नासधूस केली. वाहनांच्या काचा फोडल्या. मारुती हिराकडली (वय 52, रा. रामलिंग गल्ली, नावगे) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती. त्यानुसार 9 जणांना अटक करण्यात आली आहे. बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात त्याची नोंद आहे.
नावगे गावामधील तरुण बेळगावला महाविद्यालयात शिकतो. त्या तरुणाचे व दुसऱ्या गावातील तरुणी यांच्यात प्रेम असल्याचे समजते. याला बहाद्दरवाडी गावाच्या तरुणांचा विरोध होता. त्यातून मतभेद निर्माण झाले. पंचांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. शिवाय काही तरुणांना समज देण्याचा प्रयत्न केला. हा राग मनात धरून सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास तुफान दगडफेक केल्याची घटना घडली.
Belgaum Clash between two groups over a love affair Navage Village belgavkar belgaum Navge Belgaum
Belgaum Clash between two groups love affair Navage Village
Belgaum Clash between two groups Navage
Clash two groups Navage Love Affair belgavkar
Navage Love Affair belgaum
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements