बेळगाव—belgavkar : बिजगर्णी तसेच कावळेवाडी आणि राकसकोप गावची महालक्ष्मी यात्रा 16 एप्रिलपासून करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. त्यामुळे गावकरी जोरदार तयारीला लागले आहेत. तब्बल 30 वर्षांनंतर लक्ष्मी यात्रा होणार असून, गुरुवारी महालक्ष्मी देवीचा चौथरा बांधण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर धार्मिक विधी करून मराठी शाळेच्या पटांगणात देवीची आसन व्यवस्था बांधण्याची तयारी करण्यात येत आहे. परंपरेनुसार शाळेच्या, गावांच्या वेशीत वडाच्या झाडानजीक चौथरा उभारण्यात येणार आहे. त्यासमोर भव्य मंडपही उभारण्यात येणार आहे. शाळेचे पटांगण भव्य असल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
गुरुवारी पटांगण परिसरात सकाळपासूनच ग्रामस्थ मंडळ, गावकरी जमू लागले होते. त्यानंतर चौथऱ्याचा पूर्ण आराखडा तयार करण्यासाठी ग्रामस्थ काही ठिकाणी बांधण्यात आलेल्या चौथऱ्याची पाहणी करण्यासाठी निघाले. 70 फुटाचा रथ या यात्रेचे आकर्षण ठरणार असून, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यांत यात्रा होणार आहे. ग्रामस्थांमध्ये सद्या उत्साहाचे वातावरण असून, ग्रामस्थ आतापासूनच यात्रेच्या तयारीला लागले आहेत.
यावेळी अध्यक्ष वसंत अष्टेकर, विष्णु मोरे, मारुती जाधव, श्रीरंग भास्कळ, कल्लाप्पा अष्टेकर, कृष्णा जाधव, ग्रामपंचायत सदस्य संदीप अष्टेकर, बबलू नावगेकर, परशराम भास्कळ, नारायण भास्कळ, यशवंत जाधव, बंडू भास्कळ, अब्दुल नावगेकर, आदी उपस्थित होते.
Belgaum Bijagarni Village Laxmi Yatra belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Bijagarni Village Laxmi Yatra
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310