- बेळगावातील सुवर्णसौध म्हणजे पांढरा हत्ती
- बेळगावातील सुवर्णसौधचा उपयोग केवळ अधिवेशनापुरते मर्यादित
बेळगाव @कर्नाटक : बेळगावऐवजी बंगळूरला हिवाळी विधिमंडळ अधिवेशन घेण्याबाबतच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरू झाल्या आहेत. गेल्या महिन्यांत विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींनी बेळगाव दौरा करून अधिकाऱ्यांना विधिमंडळ अधिवेशनाची तयारी करण्याबाबत कळविले होते. मात्र, दुसरीकडे सरकारकडून अधिवेशनाची तारीख घोषणेबाबत चालढकल सुरू आहे. त्यामुळे अधिवेशन संदर्भात संभ्रमनिर्माण झाला आहे.
बेळगावात दरवर्षी डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशन आयोजिले जाते. मात्र, यंदा याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. नुकतीच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत बेळगावमधील विधिमंडळ अधिवेशनाची तारीख घोषित करण्यात आली नाही. त्यामुळे आता बेळगावऐवजी बंगळुरात अधिवेशन घेण्याबाबतच्या चर्चेला जोर आला आहे. त्यासाठी येथील काही संघटनांनी याविरोधात आवाज उठविण्यास सुरू केले आहे. मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्यात अधिवेशनाची तारीख जाहीर केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर यांच्यासह विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी गेल्या महिन्यांत बेळगाव दौरा केला. दौऱ्यामध्ये विधिमंडळ अधिवेशन डिसेंबर महिन्यांत घेण्यात येईल, अशी माहिती देताना ९ डिसेंबरपासून अधिवेशन घेण्याबाबतचे सूतोवाच केले होते. मात्र, आता यासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.अधिवेशन बंगळुरलाच घेण्याबाबत तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे येथील संघटनांनी बेळगावातच अधिवेशन घ्यावे, अशी मागणी करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय अधिवेशनपूर्वी बेळगावातील रस्त्यांची दुरुस्ती केली जावी, स्वच्छता केली जावी. महानगरपालिका अखत्यारितील विकासासाठी त्वरित निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मात्र, याची सरकारच्या पातळीवर किती गंभीर दखल घेतली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.सुवर्णसौंध म्हणजे पांढरा हत्ती
बेळगावातील सुवर्णसौधचा उपयोग केवळ अधिवेशनापुरते मर्यादित राहिला आहे. यामुळे सुवर्णसौधला पांढरा हत्ती म्हटले जाते आहे. मात्र, आता दुर्दैवाने वर्षातून एकदा आयोजित करण्यात येणारे अधिवेशनही अंधातरी आहे, अशी चर्चा सुरू आहे. यामुळे सुवर्णसौंध इमारतीमध्ये अधिवेशन घेऊन बेळगावसह उत्तर कर्नाटक भागाविषयी चर्चा केली जावी, अशी मागणीही संघटनांनी केली आहे.
Legislature session in Belgaum
Legislature session in Belgaum
Legislature session in Belgaum
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements