दड्डी-मोहनगा श्री भावेश्वरी देवी यात्रा
बेळगाव—belgavkar : महाराष्ट्र, कर्नाटक व अन्य राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मोदगे (दड्डी-मोहनगा) (ता. हुक्केरी) येथील भावेश्वरी देवीच्या यात्रेला रविवार (दि. 25 फेब्रुवारी) पासून सुरुवात होत आहे. भावेश्वरी यात्रा रविवार (दि. 25) ते मंगळवार (दि. 27) असे 3 दिवस असली तरी या त्यानंतर आठ दिवस सुमारे दीड लाख भाविक दर्शनासाठी येतात. दड्डी-मोहनगा श्री भावेश्वरी देवी यात्रोत्सवाला रविवारपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून सकाळी 6 वाजल्यापासून अतिरिक्त बस सोडल्या जाणार आहेत.
मोहनगा-दड्डी यात्रेला बेळगाव परिसरातून जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. प्रवाशांच्या सोयीखातर बेळगाव-दड्डी मार्गावर जादा 30 बसेस सोडल्या जाणार आहेत. गतवर्षी या यात्रेतून परिवहनला साडेसात लाखांचा महसूल प्राप्त झाला होता. त्यामुळे यंदादेखील मोदगा यात्रेतून समाधानकारक उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा परिवहनला आहे. बेळगाव-मोदगा तिकीट दर मोठ्यांसाठी 80 रुपये तर हाफ तिकीट दर 40 रुपये आकारणी केली जाणार आहे. विशेषत: शक्ती योजनेंतर्गत महिलांना मोफत प्रवास दिला जाणार आहे. भावेश्वरी देवीची यात्रा तीन दिवस म्हणजेच मंगळवारपर्यंत चालणार आहे. याकाळात देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या अधिक राहणार आहे. यासाठी बेळगाव बसस्थानकातून जादा बसेसची सोय करण्यात आली आहे.
हेही वाचा : दड्डी-मोहनगा श्री भावेश्वरी यात्रा
रविवारी शस्त्र इंगळ्या कार्यक्रम होणार असून सायंकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी 6 पर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. यानंतर सोमवारी (दि. 26) भरयात्रा होईल. मंगळवारी (दि. 27) रोजी पालखी सोहळा व यात्रा समाप्ती होईल. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोदगे या प्रमुख गावासह सलामवाडी, शट्टीहळी, खवणेवाडी, दड्डी-रामेवाडी या गावात मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. मोदगे येथील भावकाई देवी पाटील ट्रस्ट कमिटी, ग्रामपंचायत, मुंबई येथील पाटील मित्र मंडळ व ग्रामस्थ यांच्या वतीने यात्रेची जय्यत तयारी केली आहे. कडक बंदोबस्त ठेवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नियोजन केले आहे.
सदर यात्रा प्रामुख्याने मोदगे, सलामवाडी, शेट्टीहळी, खवणेवाडी, दड्डी – रामेवाडी अशी पाच गावांची असली तरी बेळगाव, हुक्केरी, चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यासह अन्य ठिकाणाहून सुमारे दीड लाख भाविक येतात. येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. भावकाईदेवी पाटील ट्रस्ट कमिटी, ग्रामपंचायत प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे. गावात तसेच यात्रेकरूंना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी दोन नवीन पाण्याच्या टाक्याही उभारण्यात आल्या आहेत. देवस्थान ट्रस्ट कमिटीतर्फे यंदा नव्याने गावच्या प्रवेशद्वारात स्वागत कमान उभारली जात आहे. या कमानीवर लक्ष्मीदेवीची मूर्ती तसेच दोन्ही बाजूला कमानीवर दोन हत्तींच्या मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. भावकाई देवी पाटील ट्रस्ट कमिटीकडून भाविकांना यंदा पहिल्यांदाच प्रसाद म्हणून लाडू उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यल्लमा देवीच्या धर्तीवर या मंदिरातही यंदापासूनच अशाप्रकारे प्रसाद देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबतची तयारी पूर्ण झाली आहे.
बकरी-कोंबडी विक्री बाजाराचे ठिकाण यंदा बदलले : यंदा पहिल्यांदाच बकरी आणि कोंबडी विक्री बाजाराचे ठिकाण बदलण्यात आले आहे. पूर्वी खवणेवाडी रोड या ठिकाणी बाजार भरत होता. मात्र यंदा तो बदलून हा बाजार सलामवाडी रोड, गौळदेव मंदिर येथील मोदगे गावच्या गायरानात नियोजित केला आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत व यात्रा कमिटीतर्फे मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच वीज दिव्यांची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व महाराष्ट्र – कर्नाटकातील भाविकांनी या बदललेल्या ठिकाणाची नोंद घ्यावी, असे आवाहन यात्रा कमिटीतर्फे करण्यात आले आहे.
Belgaum Bhaveshwari Yatra at Modaga Daddi Mohanage bus. Belgaum Bhaveshwari Yatra at Modaga Daddi Mohanage bus. Belgaum Bhaveshwari Yatra at Modaga Daddi Mohanage bus. Belgaum Bhaveshwari Yatra at Modaga Daddi Mohanage bus
Belgaum Bhaveshwari Yatra at Modaga Daddi Mohanage bus
Belgaum Bhaveshwari Yatra at Modaga Daddi Mohanage bus belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements