बेळगाव—belgavkar : अनगोळ येथे सुमारे पाऊण कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे दिवाळीनंतर अनावरण करण्यात येणार आहे. याचे निमंत्रण साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना नुकताच देण्यात आले. अनगोळ येथे सुमारे 30 लाख रुपये खर्च करून छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती उभारण्यात आली आहे. मूर्ती, चबुतरा तसेच आजूबाजूच्या सौंदर्याकरणासाठी 70 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
या ठिकाणचे किरकोळ काम अद्याप सुरू आहे. ते लवकरच संपणार असून बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्याकडून मूर्तीच्या अनावरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी त्यांनी साताऱ्याचे भाजपचे खा. उदयनराजे भोसले यांची नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना मूर्ती अनावरणाचे निमंत्रण दिले. खा. उदयनराजे यांनी पावसाळा संपल्यानंतर आपण येऊ, असे आश्वासन आ. पाटील यांना दिले आहे. त्यामुळे दिवाळीनंतर साधारणतः नोव्हेंबरमध्ये या मूर्तीचे अनावरण करण्यात येणार आहे. खासदारांना निवेदन देतेवेळी भाजपचे राज्य उपाध्यक्ष व माजी आ. अनिल बेनके व मान्यवर उपस्थित होते.
Unveiling statue Angol Sambhaji Maharaj Belgaum
Unveiling statue Angol Sambhaji Maharaj Belgaum
Unveiling statue Angol Sambhaji Maharaj Belgaum
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements