माघ पौर्णिमेनंतर भावेश्वरी देवीचा वार्षिक यात्रोत्सव
बेळगाव—belgavkar : हुक्केरी तालुक्यातील मोदगा येथे भावेश्वरी यात्रेपूर्वी नियोजन बैठक बोलावण्यात आली होती. मौजे मोदगेतील (मोहनगे) भावेश्वरी देवीची यात्रा रविवारपासून (25 फेब्रुवारी) सुरू होणार आहे. बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. तसेच, कामाचा आढावाही घेतला. रविवार 25 ते मंगळवार 27 फेब्रुवारी रोजी होत असलेल्या यात्रोत्सवाच्या पूर्वतयारीची बैठक होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भावेश्वरी देवी ट्रस्टचे अध्यक्ष भाऊराव पाटील होते. प्रास्ताविक जनार्दन पाटील यांनी केले. भाविकांनी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे यात्रा समितीने कळविले आहे.
माघ पौर्णिमेनंतर या भावेश्वरी देवीचा वार्षिक यात्रोत्सव आयोजित केला जातो. नवसाला पावणारी देवी म्हणून भावेश्वरी देवी प्रसिद्ध आहे. बेळगाव सह कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा येथील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील हुक्केरी तालुक्यातील मोदगे दड्डी (मोहनगा-दड्डी) येथील भावेश्वरी देवी वार्षिक यात्रा सालाबादप्रमाणे 25 फेब्रुवारीला होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि उत्तर कर्नाटक बेळगाव भागांतील लाखों भाविक या देवीच्या दर्शनाला यात्रेला दरवर्षी येत असतात.
तहसीलदार बलराम कट्टीमनी यांनी तालुक्यातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी योग्य पावले उचलावीत, स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, 24 तास वीजपुरवठा करावा, अशा सूचना दिल्या आहेत. मोदगे ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी चार दिवस नदीला पाण्याची सोय केली जाईल, असे सांगितले आहे. यात्राकाळात 20 फेब्रुवारीपर्यंत मोदगे शेतवडीतील पाण्याच्या मोटारी बंद ठेवाव्यात, असे भावेश्वरी ट्रस्टचे अध्यक्ष भाऊराव पाटील यांनी सांगितले.
या बैठकीमध्ये हुक्केरी तालुका तहसीलदार बलराम कट्टीमनी, पोलिस निरीक्षक एम. एस. शीरट्टी उपस्थित होते. या बैठकीत निरंजन मगदूम, राजेंद्र इटेकर व रमजान मकानदार, स्मिता कोकितकर, शरद पाटील, गीता बागडी, सुरेश अस्वले, संतोष कब्बगोळ उपस्थित होते. संतराम पाटील, सुधाकर पाटील, चंद्रकांत पाटील, भागोजी पाटील, मारुती पाटील, अशोक पाटील, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Bhaveshwari Yatra at Modage Daddi Mohanage belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Bhaveshwari Yatra at Modage Daddi Mohanage
Belgaum Bhaveshwari Yatra at Modage Daddi Mohanage
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements