बेळगाव—belgavkar : येथील शहर बस स्थानकाजवळ रिक्षामध्ये सापडलेली 5 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग येथील रिक्षा चालकाने प्रामाणिकपणे परत केली. रिक्षा चालक खलिद एम. पठाण (रा. वीरभद्रनगर, सातवा क्रॉस) यांचे या चांगुलपणामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
नंदी (ता. चिकोडी, बेळगाव) या गावचे प्रमोद कोकणे हे बंगळूर ते बेळगाव असा रेल्वेने प्रवास करून आले होते. रेल्वे स्टेशन येथून रिक्षाने बेळगाव बस स्थानकाकडे आले. या दरम्यान रिक्षामध्ये प्रमोद कोकणे हे बॅग विसरून आपल्या नंदी (ता. चिकोडी) या गावी गेले. मात्र रिक्षामध्ये बॅग राहिल्याचे रिक्षाचालक यांना शुक्रवारी सकाळी निदर्शनास आले. सदर बॅग खलीद यांनी बेळगाव ऑटो ओनर्स अँड ड्रायव्हर असोसिएशनच्या कार्यालयात जमा केली. यानंतर ऑटो रिक्षा असोसिएशनचे अध्यक्ष मन्सूर होनगेकर यांनी ट्रॅफिक पोलीस व कॅम्प पोलिसांना याची माहिती दिली.
यानंतर सदर बॅग प्रमोद कोकणे यांची असल्याची खात्री करून त्यांना निरोप देण्यात आला. शनिवारी सकाळी प्रमोद कोकणे हे स्वतः हजर राहून बॅग आपल्या ताब्यात घेतली. यावेळी रिक्षाचालक खलिद यांना ₹ 2000 रुपयांचे बक्षीस देण्यात आले. सदर बॅगमध्ये दहा तोळ्याहून अधिक दागिने व अन्य महत्वाची कागदपत्रे होती. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष मन्सूर होणगेकर, उपाध्यक्ष गौतम कांबळे, सदस्य अजीम मुल्ला, इमाम किल्लेवाले, सादिक मुल्ला यांच्यासह अन्य रिक्षा चालकांच्या वतीने खलिद यांचा सत्कार करण्यात आला.
Belgaum bag worth 5 lakhs return belgavkar
बेळगाव belgaum belgavkar
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements