बिझनेस छोटा असो वा मोठा…. पैसा कमावणे त्यामागील मुख्य उद्देश
From Millionaire to a Monk
जगभरात लोक पैसे कमावण्यासाठी रात्रंदिवस झटतात. तर काही लोक घर, कुटुंबाला सोडून दुसऱ्या शहरात जाऊन संघर्ष करतात. परंतु असेही काही लोक आहेत जे लाखो-कोटींच्या संपत्तीचा त्याग करून आज देवाच्या भक्तीत मग्न झाले आहेत. आपलं समृद्ध राज्य सोडून सन्यास घेणाऱ्या अनेक राजा-महाराजांबद्दल तुम्ही ऐकले असेल. आता तुम्ही म्हणाल की असे राजे शतकानुशतके पूर्वी अस्तित्वात होते. पण आज आम्ही तुम्हाला 21 व्या शतकातील एका व्यावसायिकाविषयी सांगणार आहोत, ज्याने क्षणात मायेचा त्याग करून आपली 600 कोटी रुपयांची संपत्ती त्यागली.
DR इंटरनॅशनलचे संस्थापक भंवरलाल रघुनाथ दोशी यांनी जैन संन्यासी बनण्यासाठी 600 कोटी रुपयांच्या व्यवसायाचे साम्राज्य नाकारले आणि संन्यासाचा मार्ग अवलंबला, असा अहवाल डीएनएने दिला. भंवरलाल रघुनाथ दोशी यांना वडिलांकडून व्यवसायाचा वारसा मिळाला होता, जे राजस्थानमधील एक छोटे कापड व्यापारी होते. एकेकाळी अवघ्या 30,000 रुपयांचे भांडवल असलेले व्यावसाय साम्राज्याचे मूल्य आता कोट्यावधी रुपयांचे आहे.
भंवरलाल रघुनाथ दोशी यांनी सुरीश्वरजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली 354 वे जैन धर्मोपदेशक म्हणून भिक्षुत्व स्वीकारले. मात्र, त्यांनी हा निर्णय अचानक घेतला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून भंवरलाल रघुनाथ दोशी यांचा जैन धर्माकडे ओढा होता. 1982 पासून जैन व्याख्यानांची वाढती आवड आणि अध्यात्माकडे वाढता कल यामुळे प्रेरित होऊन अब्जाधीश उद्योजकाने सर्वकाही त्याग करण्याचे धाडसी पाऊल उचलले. भंवरलाल रघुनाथ दोशी योग्य विधी करून जैन भिक्षुक बनले. सुमारे दीड लाख लोक आणि 1000 साधू-साधूंच्या समारंभात दीक्षा घेतली.
प्लास्टिक ट्रेडिंगमधून दोषी यांनी करोडो रुपयांचे साम्राज्य उभे केले. मात्र, त्यांनी आपली संमत्ती एक मठाला दान करून संन्यास स्विकारला. दोन मुले व एका मुलीचे वडील भंवरलाल यांना आपल्या कुटुंबियांना राजी करण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागली. अखेर भंवरलाल यांना कुटुंबियांनी दीक्षा घेण्यास होकार दिला. गुजरातमधील अहमदाबाद शहर आयोजित एका दीक्षांत सभारंभात दीक्षा घेऊन संन्यास स्वीकारला.
Bhanwarlal Raghunath Doshi Delhi Plastic King
Bhanwarlal Raghunath Doshi Delhi Plastic King
Bhanwarlal Raghunath Doshi Delhi Plastic King
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements