कर्नाटकमधील भक्ताची साईचरणी अनोखी गुरुदक्षिणा
शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला नेहमीच भक्तांची गर्दी पाहायला मिळते (Shirdi Sai Baba). देशविदेशातून असंख्य भक्त साईचरणी लीन होण्यासाठी येत असतात. साईचरणी लीन झालेला भक्त आपापल्या परीने वस्तू किंवा रोख रकमेचे दान देत असतो. अशातच एका कर्नाटकाची रजधानी बेंगळुरुमधील भक्ताने तब्बल ₹ २९ लाखांचा सोन्याचा मुकुट साईचरणी दान केला आहे.
शिर्डी साई बाबांच्या (Sai Baba) दर्शनाला दररोज हजारो भाविक येत असतात. यामधील बहुतेक भाविक हे रोख स्वरुपात किंवा सोने-चांदीच्या स्वरुपात मोठे दान देत असतात. आज (मंगळवार, ९ जानेवारी) बेंगळुरुमधील राजाराम कोटा यांच्या परिवाराने शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतले.
यावेळी कोटा परिवाराकडून तब्बल 29 लाख रूपये किमतीचा सोन्याचा मुकुट साईबाबा चरणी अर्पण करण्यात आला. कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवले यांच्याकडे हा मुकूट सुपूर्द करण्यात आला. आज साईंच्या मुर्तीवर हा मुकूट चढवण्यात आला होता.
दरम्यान, नववर्षाच्या स्वागतालाही साईभक्तांनी शिर्डीमध्ये गर्दी केली होती. याकाळात शिर्डी देवस्थानकडून शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शिर्डीमध्ये २३ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान आठ लाख भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले. तसेच याकाळात भक्तांनी तब्बल १६ कोटींचे दानही साईचरणी अर्पण केले.
Shirdi Sai Baba
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements