Ayodhya Ram Mandir Inauguration : तब्बल 500 वर्षांची प्रतिक्षा फळाला आली अन् अवघ्या देशवासियांच्या मनातील इच्छा पूर्ण झाली. अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात प्रभू श्रीराम विधीवत विराजमान झाले. अयोध्येसह (Ayodhya) संपूर्ण देशभरात राम नामाचा जयघोष पाहायला मिळाला. नव भूतो न भविष्यती अशा अभूतपूर्व सोहळ्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाचा (Shri Ram) विधीवत अभिषेक सोहळा पार पडला. डोळ्यांचं पारणं फेडणारा अयोध्येतील सोहळा अनुभवताना प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले आहेत.
2001 मध्ये बेळगाव शहरातील वडगाव येथील चित्रकार महेश परशराम होनुले यांनी कार्डबोर्ड अर्थात पुठ्ठ्यापासून तेव्हा बनविलेली श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती आणि अयोध्येतील सोहळ्यानिमित्त आजही प्रशंसेस पात्र ठरत आहे. पूर्वी येळ्ळूर आणि सध्या संभाजीनगर, वडगाव येथील रहिवासी असलेले महेश होनुले हे जलरंगात चित्रे काढणारे पूर्णवेळ व्यावसायिक चित्रकार आहेत. येळ्ळूर येथील शिवाजी विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या महेश यांनी अनगोळ येथील उमा फाईन आर्ट इन्स्टिट्यूटमधून आर्ट मास्टर ही पदवी संपादन केली आहे. त्यावेळी म्हणजे 2001 मध्ये कलेचे शिक्षण घेत असताना अयोध्येतील तत्कालीन नियोजित श्रीराम मंदिराचे छायाचित्र त्यांनी बघितले.
क्राफ्ट हा विषय असल्यामुळे महेश यांना ते चित्र इतके भावले की त्यांनी त्याची प्रतिकृती तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जवळपास महिना-दीड महिना खपवून त्यांनी कार्डबोर्ड अर्थात पुठ्ठ्यांच्या सहाय्याने श्री राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली. महेश होनुले यांनी बनवलेली ही प्रतिकृती 36 इंच लांबी आणि साधारण 16 इंच रुंदीसह 30 इंच उंचीची आहे. श्री राम मंदिर वास्तूची जवळपास सर्व वैशिष्ट्य या प्रतिकृती दर्शविण्यात आली आहेत. श्री राम मंदिराची देखणी प्रतिकृती बनविणाऱ्या महेश होनुले यांच्या कलाकुसरीचे त्यावेळी सर्वत्र कौतुक व प्रशंसा झाली होती. महेश यांनी आपल्या घरी जपून ठेवलेल्या त्या प्रतिकृतीची आता जवळपास 23 वर्षानंतर अयोध्येतील श्री राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सध्या देखील वडगाव परिसरात मुक्तकंठाने प्रशंसा होत आहे.
Belgaum Artist Parashram Honule Ayodhya belgav belagavi belgavkar
belgavkar news
belgaum news
Belgaum Artist Parashram Honule Ayodhya
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements