Ayodhya Ram Mandir : अयोध्या येथील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. पीएम मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यासाठी विरोधकांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी आपण या सोहळ्याला जाणार नसल्याचे स्पष्ट करत भाजपवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यादरम्यान भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील शंकराचार्यांप्रमाणेच असल्याचे म्हटले आहे.
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी दावा केला आहे की, पीएम मोदी देखील शंकाराचार्य यांच्याप्रमाणे जीवन जगतात आणि प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी कठोर तप करत आहेत. दुबे यांनी त्रेता युगातील काही प्रसंगांचा उल्लेख करत हे वक्तव्य केलं आहे.
भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाले की, तेव्हा कर्मच मुख्य होतं, तर त्यामध्ये शंकराचार्यांची पद्धत असो, शंकराचार्यांना कोणत्या आधारावर इतका सन्मान मिळतो, शंकराचार्य परंपरेचा आम्ही सन्मान करतो. मात्र कोणत्या आधारावर शंकराचार्य हे माननीय…. जसे शंकराचार्य एकटे राहातात, समाजासाठी जीवन घावलतात, पंतप्रधान देखील तसेच आहेत. ज्या पद्धतीने विधींसाठी 11 दिवस उपवास केला पाहिजे, तसा ते करत आहेत. 17-18 दिवस ते पलंगावर झोपणार नाहीत. त्यांनी जमीनीवर झोपण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या तपस्वीचे जीवन असेच असते.
22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा केली जात आहे. मात्र यामध्ये चारपैकी एकही शंकराचार्य सहभागी होणार नाहीत. ज्योतिर्पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरनंद सरस्वती यांनी मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले नसल्याचे म्हणत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर प्रश्न उपस्थित केले होते. तर कर्नाटकातील श्री श्रृंगेरी शारदा पीठ, गुजरातमधील द्वारका शारदा पीठ, उत्तराखंडमधील ज्योतिर्पीठ आणि ओडिशा येथील गोवर्धन पीठाच्या शंकराचार्यांनी प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास विरोध देखील केला नाहीये (प्राणप्रतिष्ठेआधी राम लल्लाच्या डोळ्यावर बांधलेली असेल पट्टी;).
Ayodhya Ram Mandir Nishikant Dubey Modi Shankaracharya
Ayodhya Ram Mandir Nishikant Dubey Modi Shankaracharya
Ayodhya Ram Mandir Nishikant Dubey Modi Shankaracharya
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310