इतकेच नाही तर त्याचा साखरपुडाही झाला. मात्र..
UPSC सारख्या परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी तरुण जिवाचं राण करताना पाहायला मिळतात. या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवल्यानंतर होणारं कौतुक आणि समाजात वाढणारी प्रतिष्ठा यासाठी एक 24 वर्षीय तरुणाने आयपीएस अधिकारी असल्याचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आयपीएस अधिकारी असल्याचे सांगितल्यानंतर या तरुणाला गावातून खूप आदर मिळू लागला, इतकेच नाही तर त्याचा साखरपुडाही झाला.
मात्र, शनिवारी उदयपूर पोलिसांनी या बनावट आयपीएसला अटक केली आहे. जो राजस्थान येथील बानसूर येथील असून तो गेल्या दीड वर्षांपासून बनावट आयपीएस अधिकारी बनून सर्वांना मूर्ख बनवत होता. पण एका छोट्याशा चुकीमुळे त्याचा पर्दाफाश झाला. मीडिया रिपोर्टनुसार, तो आपला भावी मेहुणा आणि इतर काही जणांसोबत उदयपूरला फिरायला आला असता त्याने सर्किट हाऊस मॅनेजरसमोर एक चूक केली. मॅनेजरला त्याच्यावर संशय आला आणि त्याने तात्काळ पोलिसांना फोन केला, त्यावर पोलिसांनी त्याला सॅल्यूट करण्यास सांगितले, तेवढ्यात त्याने विरुद्ध हाताने सॅल्यूट केला आणि तो पकडला गेला. यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि त्याचे फेसबुक पेजही तपासले असता सर्वांनाच मोठा धक्का बसला. या फेक अधिकाऱ्याने सांगितलं की त्याने अनेक युट्यूब चॅनल्सना खोट्या मुलाखतीही दिल्या आहेत.
पोलिसांनी इंद्राज सैनी, अमित चौहान आणि सत्यनारायण कनोलिया यांच्यासह बनावट आयपीएस सुनील सांखला याला अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सुनीलने आपण सीबीआय अधिकारी झाल्याचे गावकऱ्यांना सांगितले होते. तो स्वत:ला महाराष्ट्र कॅडरचा आयपीएस अधिकारी म्हणवून घेऊन मुंबईत पोस्टिंग असल्याचे लोकांना सांगत आहे. अधिक चौकशीत सुनीलने 2020 च्या भरतीत यूपीएससीची तयारी केली होती, पण त्यात त्याची निवड झाली नसल्याचे समोर आले.
गावात हवा करण्यासाटी सुनीलने आयपीएस अधीकारी असल्याचे सांगायला सुरूवात केली. गावात आणि घरी त्याने 263 वी रँक मिळवल्याचे सांगितले. यापूर्वी सुनीलने गावात आणि कुटुंबियांना सांगितले होते की, त्याला राजस्थान पोलिस आणि इन्कम टॅक्समध्ये लिपिक म्हणून नोकरी मिळाली आहे, परंतु तसे काहीही झालेले नाही. गावातील लोक आणि कुटुंबीय विचार करत होते की सरकारी नोकरी सोडून यूपीएससी पास केली आहे.
आपली यूपीएससीमध्ये निवड झाल्याची खोटी माहिती सुनीलने आपल्या कुटुंबात आणि गावात पसरवली होती. ते गावात आल्यावर गावातील लोकांनी व कुटुंबीयांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. इतकंच नाही तर त्याने आणि त्याच्या मित्रांनी निवडी झाल्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट देखील केल्या. सुनिल याचा वर्षभरापूर्वी तिचा साखरपुडा झाला होता. येथेही त्याने मुलीला खोटी माहिती दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
arrested man posing fake IPS officer and CBI
arrested man posing fake IPS officer and CBI
arrested man posing fake IPS officer and CBI
arrested man posing fake IPS officer and CBI
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements