सर्वात धक्कादायक निकाल लागणार Andhra Pradesh Exit Poll 2024
- Lok Sabha Election 2024 Exit Poll
- Andhra Pradesh Exit Poll 2024 : Exit polls predict NDA majority in Lok Sabha Elections 2024
- Andhra Pradesh Assembly Exit Poll result
Exit Poll 2024 : आंध्र प्रदेशात सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला मोठा दणका बसणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा करिष्मा संपला असून त्यांच्या भगिनी आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा शर्मिला रेड्डी यांनाही छाप पाडता आलेली नाही.
एबीपी-सी वोटर एक्झिट पोलनुसार, आंध्रात जगनमोहन यांच्या पक्षाला केवळ 0 ते 4 जागा मिळू शकतात. तर एनडीएला 21 ते 25 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशात सर्वात धक्कादायक निकाल या राज्यातील असणार आहे. मागील निवडणुकीत जगनमोहन यांच्या पक्षाने एकहाती विजय मिळवला होता. लोकसभेत पक्षाचे 25 पैकी तब्बल 22 खासदार निवडून गेले होते. तर माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी पक्षाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले होते.
2024 मध्ये टीडीपीने भाजपसोबत आघाडी करत वायएसआरसमोर आव्हान उभे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक सभा राज्यात झाला. त्यामुळे मोदींचा करिष्मा राज्यात चालणार असल्याचे संकेत एक्झिट पोलने दिले आहेत.
दुसरीकडे शर्मिला रेड्डी यांना करिष्मा दाखवता आलेला नाही. राज्यात काँग्रेसला एकही जागा मिळताना दिसत नाही. लोकसभा निवडणुकीआधी शर्मिला रेडडी यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करत हवा निर्माण केली होती. त्याची बरीच चर्चाही राज्यात झाली. पण प्रत्यक्षात हा फुसका बार ठरला आहे.
विधानसभा निवडणुकीत काय? : लोकसभा निवडणुकीसोबत राज्यात विधानसभेचीही निवडणूक पार पडली आहे. पण अद्याप विधानसभेचा एक्झिट पोल आलेला नाही. मात्र, लोकसभेत जगनमोहन यांचा सुपडा साफ होताना दिसत असल्याने विधानसभेतही वेगळे चित्र नसेल, या चर्चांना आता जोर आला आहे.
आंध्र प्रदेश – 25
एक्झिट पोल (एबीपी-सी वोटर)
एनडीए – 21 ते 25
इंडिया – 00
वायएसआर काँग्रेस – 00 ते 04
2019 मध्ये मिळालेल्या जागा :
एनडीए – 03 (टीडीपी)
वायएसआर काँग्रेस – 22
काँग्रेस – 00
Andhra Pradesh Exit Poll 2024
Andhra Pradesh Exit Poll 2024
Andhra Pradesh Exit Poll 2024
Andhra Pradesh Exit Poll 2024
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements