बेळगाव—belgavkar : कलबुर्गी जिल्ह्यातील कोटनूर (डी) गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अवमान केलेल्या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी. त्यांना तडीपार करण्यात यावे, भविष्यामध्ये अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी मागणी करत डॉ. बी. आर. आंबेडकर क्रांती युवक संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. Lumbini Garden मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अवमान करण्यात आला आहे. दि. 22 जानेवारी रोजी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. देशाला घटना निर्माण करून दिलेल्या महामानवाच्या पुतळ्याचा अवमान हा संपूर्ण मानवजातीचा अवमान आहे.
अशा घटना वारंवार घडत आहेत. यामुळे समाजात अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे समाजातील शांती नाहीशी होत आहे. तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा प्रकारांना कदापिही थारा देऊ नये. पुतळ्याचा अवमान करणाऱ्या समाजकंटकांना त्वरित अटक करण्यात यावी. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
Belgaum Ambedkar statue desecration in Kalaburagi Kotnur belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Ambedkar statue desecration in Kalaburagi Kotnur
Ambedkar statue desecration in Kalaburagi Kotnur
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310