महाराष्ट्र : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर केला. या निकालाचं वाचन करताना आमदारांच्या संख्याबळावरच पक्ष कुणाचा यावर निर्णय देणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, खरी राष्ट्रवादी कुणाची? मूळ पक्ष कुणाचा? असा प्रश्न कायम असताना दोन्ही गटाकडून पक्षावर दावा करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. मात्र मूळ पक्ष कुणाचा हे पक्षाचे संविधान आणि विधिमंडळातील संख्याबळावर ठरवले जाते. या प्रकरणात आपण दोन स्वतंत्र निकाल देणार, असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं (NCP vs NCP Disqualification : Ajit Pawar faction real NCP, no MLAs to be disqualified).
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा या मुद्द्यावर आपण पहिला निकाल देणार आणि त्यानंतर आपण आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल देणार असं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. तर अजित पवार यांच्या गटाला मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
आमदार अपात्रतेबाबत निकाल देतान शिवसेनेप्रमाणे दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठेवण्याचा निर्णय देण्यात आला आहे. शरद पवार गटाला दिलासा देणारं आहे; मात्र राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार यांचा असल्याचा ऐतिहासिक निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. विधीमंडळ सदस्यांची संख्या पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडे 41 आमदारांचं पाठबळ आहे. पक्षीय रचना पाहता कुठला गट हा राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतो, हे प्रथमदर्शनी सांगता येणार नाही. पण विधीमंडळ गटाचे पाठबळ पाहता अजित पवार गट हाच राजकीय पक्ष आहे असे दिसते, याच निरीक्षणाच्या आधारावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल दिल्याचं सांगितलं.
नवनवीन पक्षांसोबत आणि विचारसरणी सोबत हल्ली युती आणि आघाडी होताना आपण पाहत आहोत. प्रत्येक घटनेवर दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही. अजित पवार आणि शरद पवार गटामध्ये पक्षांतर्गत वाद आहे. कोणीही पक्ष सोडलेला नाही, त्यामुळे दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नसल्याचं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.
विधीमंडळ सदस्यांची संख्या पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडे 41 आमदारांचं पाठबळ आहे. पक्षीय रचना पाहता कुठला गट हा राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतो, हे प्रथमदर्शनी सांगता येणार नाही. पण विधीमंडळ गटाचे पाठबळ पाहता अजित पवार गट हाच राजकीय पक्ष आहे असे दिसते, याच निरीक्षणाच्या आधारावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल दिल्याचं सांगितलं.
नवनवीन पक्षांसोबत आणि विचारसरणी सोबत हल्ली युती आणि आघाडी होताना आपण पाहत आहोत. प्रत्येक घटनेवर दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही. अजित पवार आणि शरद पवार गटामध्ये पक्षांतर्गत वाद आहे. कोणीही पक्ष सोडलेला नाही, त्यामुळे दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नसल्याचं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.
Ajit Pawar faction real NCP
Ajit Pawar faction real NCP
Ajit Pawar faction real NCP
Ajit Pawar faction real NCP
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements