हत्येचं कारण ऐकाल तर हादरून जाल
मुलाला गोव्यात मारलं, बॅगेतून मृतदेह कर्नाटकला नेला, तिने असं का केलं?
गोवा आणि कर्नाटकच्या चित्रदुर्ग इथं एक हैराण करणारे प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी एका आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंपनीच्या महिला सीईओने तिच्या 4 वर्षाच्या मुलाची हत्या केली. त्यानंतर महिला मुलाचा मृतदेह बॅगेत घेऊन गोव्याहून कर्नाटकला जात होती. परंतु पोलिसांनी महिलेला अटक केली. या महिलेजवळ असलेला मुलाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवला (Suchana Seth, the CEO and founder of a Bengaluru-based Artificial Intelligence (AI)).
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महिला सूचना सेठचं लग्न 2010 मध्ये झाले होते (CEO and founder of The Mindful AI Lab, Suchana). 2019 मध्ये महिलेने मुलाला जन्म दिला. 2020 पासून तिचं पतीसोबत भांडण सुरू होते. हे प्रकरण कोर्टात गेले. ज्यानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. कोर्टाने वडिलांना दर रविवारी मुलाला भेटण्याची परवानगी दिली. कोर्टाच्या या आदेशाने महिला दडपणाखाली आली. वडिलांना मुलाला भेटू नये असं तिला वाटत होते. त्यासाठी तिने प्लॅन केला. महिला शनिवारी मुलाला घेऊन गोव्याला निघून गेली आणि तिथे हॉटेलमध्ये मुलाची हत्या केली.
मुलगा वडिलांना भेटू नये यासाठी निर्दयी महिलेने पोटच्या मुलाला कायमचं संपवलं. गोव्याच्या ज्या हॉटेलमध्ये महिला थांबली होती. तिथे तिने येताना तिच्या 4 वर्षीय मुलाला सोबत आणले होते. परंतु हॉटेलमधून निघताना महिलेसोबत मुलगा नव्हता. महिलेला एकटं जाताना पाहून हॉटेल स्टाफनं मुलाबाबत विचारणा केली तेव्हा मुलाला आधीच घरी पाठवले असं महिलेने सांगितले. त्यानंतर महिला हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर स्टाफने तिची रुम चेक केली तेव्हा रक्ताचे डाग आढळले. त्यानंतर हॉटेल स्टाफनं तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
हॉटेलकडून माहिती मिळताच पोलिसांनी सूत्रे वेगाने फिरवली. ज्या टॅक्सी चालकानं महिलेला घेऊन गेला त्याला पोलिसांनी फोन केला. त्याची चौकशी केली असता ती महिला एकटी आहे असं त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी महिलेला घेऊन जवळच्या पोलीस ठाण्यात जायला सांगितले. त्यानंतर टॅक्सी चालकाने महिलेला कर्नाटकातील चित्रदूर्ग येथील @ पोलीस ठाण्यात नेले. परंतु ते कर्नाटकच्या चित्रदुर्ग परिसरातील होते. त्यानंतर गोवा पोलीस तिथे पोहचली आणि महिलेला ताब्यात घेतले. महिलेने गोव्याच्या कंडोलिम इथं ही घटना केली. मुलाच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी तिला अटक केली.
AI firm CEO Suchana Seth
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements