महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. त्यांनी आमदारकीचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का आहे. आता यावरुन ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपा, नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. “आम्हाला फार मोठा पेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता देशाला काय तोंड दाखवतील? नांदेडमध्ये जाऊन कारगिल युद्धातील शहीदांच्या भूखंडावर अशोक चव्हाण यांनी कसा घोटाळा केला? शहीदांचा कसा अपमान केला? हे मोदी यांनी स्वत: येऊन सांगितलं. भाजपाने शहीदांच्या अपमानाविरुद्ध आंदोलन सुरु केलं. आज काय झालं? अशोक चव्हाणांना घेऊन त्याच शहीदांचा अपमान धुवून काढला का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेऊन भाजपा जगातल्या राजकारणात नवीन आदर्श निर्माण करतोय. काँग्रेसमुक्त भारत ही घोषणा त्यांनी बदलायला पाहिजे. त्यांनी काँग्रेसच शुद्धीकरण चालवलय. काँग्रेसमध्ये ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांना सोबत घेऊन महात्मा गांधींच्या शुद्धीकरणाच स्वप्न भाजपा साकार करतोय, अशी टीका संजय राऊत यांनी केली. काँग्रेसशी थेट युती टाळून भाजपा अशा प्रकारे युती करतोय. भाजपा देशाच राजकारण नासवतोय. भाजपाला वाटत असेल अशा प्रकाराने त्यांना 400 पार उडी मारता येईल. अशाने भाजपा 200 पार सुद्धा जणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला.
‘देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन, आदर्श घोटाळा कसा झाला हे सांगितलय. फडणवीस, चंद्रशेखर बावकुळे यांनी मोठ्या पड्द्यावर या क्लिप ऐकाव्यात. मोदी काय बोलले ते ही ऐकावं. महाराष्ट्राला खड्डयात घातलच, पण कुठे नेऊन ठेवलाय भाजपा माझा’, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली. कारगिल युद्धातील शहीदांच्या भूखंडावर अशोक चव्हाण यांच्या प्रेरणेने 32 माळ्याचा घोटाळा उभा राहिला. मोदींना देशात तोंड लपवून फिरावं लागेल, ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले, त्यांनाच मोदींनी पवित्र करुन घेतलय, हे राज्याच, देशाच दुर्देव आहे, असं संजय राऊत म्हणाले.
Adarsh Housing Society is a 31-storey apartment complex built in Mumbai’s Colaba
आदर्श घोटाळा हा खरंच किती मोठा घोटाळा आहे हीच शंका आहे. यापेक्षा खुप मोठे घोटाळे झालेत (Adarsh Housing scam Maharashtra Adarsh Housing Society). आदर्श नावाच्या एका गृहनिर्माण सहकारी संस्थेस मुंबईत कोलाबा येथे मोक्याच्या जागाीचा भूखंड देण्यात आला व इतर परवाने देण्यात आले. काही महत्त्वाच्या पदाधीकार्यांनी या संस्थेचे सभासद बनून सदनिका पदरात पाडली. यांतून असा अर्थ निघाला की या पदाधीकार्यांनी पदाचा वापर करून फायदा पदरात पाडून घेतला. हा सदर भूखंड कारगील युद्धातील शहीद जवानांच्या विधवा पत्नींच्या कल्याणकारी कामासाठी राखीव ठेवलेला होता. परंतु, सदनीका व सभासदत्व देताना असला कोणताही निकष पाळला गेला नाही. अशोक चव्हाणांच्या पत्नीच्या नावे (बहुतेक) सभासदत्व घेउन त्यांना एक सदनीका मिळाली. यांतील बर्याच सदनीका पदाधीकार्यांनी दुसर्याच्या नावाने घेतल्या. याबाबतची माहीती 2010 मध्ये उघड झाल्यानंतर तेव्हाचे महाराष्ट्र मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला व श्री पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री झाले.
Adarsh Housing scam Maharashtra Adarsh Housing Society. Adarsh Housing scam Maharashtra Adarsh Housing Society. Adarsh Housing scam Maharashtra Adarsh Housing Society
Adarsh Housing scam Maharashtra Adarsh Housing Society
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements