तेलुगू, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलेल्या मालवी मल्होत्राने विक्रम भट्ट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (Actress Malvi Malhotra accuses Vikram Bhatt of non-payment of dues) हिमाचल प्रदेशमध्ये जन्मलेल्या मालवीने २०१७ मध्ये हिंदी टीव्ही मालिका ‘उडान’ मधून डेब्यू केला होता. मालवीचे म्हणणे होते की, विक्रम भट्ट यांनी तिच्याकडून म्युझिक व्हिडिओमध्ये काम करून घेतले. पण अद्यापपर्यंत त्याचे पैसे दिलेले नाहीत. निर्मात्यांच्या बॅनर अंतर्गत म्युझिक व्हिडिओ ‘बर्बाद कर दिया तेरे प्यार ने’ मध्ये काम केलं होतं. या व्हिडिओचे दिग्दर्शन त्यांची मुलगी कृष्णा भट्टने केलं होतं.
मालवी मल्होत्राने आरोप केले आहे की, तिने पैशांसाठी विक्रम भट्ट यांना फोन केला, तेव्हा त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. मालवीने याबाबत अधिकृत स्टेटमेंट जारी करत म्हटले की, ‘मी मागील वर्षी कृष्णा भट्टचे दिग्दर्शन असलेल्या एका गाण्यात विक्रम भट्ट प्रोडक्शनसोबत काम केलं होतं. गाण्याचे नाव होते – ‘बर्बाद कर दिया’. त्यावेळी मी साऊथच्या एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खूप बिझी होते. परंतु, विक्रम भट्ट यांचे इंडस्ट्रीमध्ये एक नाव आहे आणि जेव्हा त्यांनी आपल्या प्रोडक्शनसोबत एका गाण्यात काम करण्यासाठी मला संपर्क केला, तेव्हा मी माझ्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढला. मला ही संधी गमवायची नव्हती, मी त्यांच्यावर विश्वास केला.’
मालवी म्हणाली, विक्रम भट्ट यांना फोन केला तर उत्तर नाही मिळाले… ती पुढे म्हणाली, ‘शूटिंगनंतर, मी त्यांना पैशांची पावती पाठवली, पण, त्यांनी उत्तर दिले नाही. पण, जेव्हा व्हीनस प्रोडक्शन कंपनीने माझ्याशी संपर्क केला आणि सांगितले की, ते हे गाणे रिलीज करत आहेत आणि मी त्याचे प्रमोशन करावे, तेव्हा मी पुन्हा त्यांच्याकडे पैशांबद्दल विचारले, तेव्हा देखील मला उत्तर मिळाले नाही. काही महिन्यांनंतर, विक्रम भट्टनी मला पुढील चित्रपटामध्ये काम करण्यासाठी म्हटलं. पण, मी ते टाळलं..’
Actress Malvi Malhotra accuses Vikram Bhatt
Actress Malvi Malhotra accuses Vikram Bhatt
Actress Malvi Malhotra accuses Vikram Bhatt
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310