Election Commission ‘नॅशनल आयकॉन’
Election Commission : बॉलिबूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाने त्यांच्यावर 2022 मध्ये मोठी जबाबदारी सोपवली होती. त्यांना ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून घोषित करण्यात आले होते. पण दीड वर्षातच ते या जबाबदारीतून मुक्त झाले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांनी राजकारणात पाऊल ठेवण्याचे सुतोवाच केले होते.
पंकज त्रिपाठी (Actor Pankaj Tripathi) यांनी मिझापूर, सेक्रेड गेम्स यांसह विविध चित्रपटांतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. त्याच जोरावर त्यांना निवडणूक आयोगाने (Election Commission) ऑक्टोबर 2022 मध्ये नॅशनल आयकॉन (National Icon) ही जबाबदारी सोपवली होती. मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती करण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती.
आयोगाने 2014 मध्ये क्रिकेटर चेतेश्वर पुजारा आणि त्याआधी महेंद्रसिंग धोनीला नॅशनल आयकॉन म्हणून घोषित केले होते. पंकज त्रिपाठी यांनी ऑक्टोबर 2022 पासून ही जबाबदारी पार पाडली. पण आता एका चित्रपटामुळे ते स्वत:हून या जबाबदारीतून मुक्त झाले आहेत. आगामी चित्रपटातील त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे ते ही जबाबदारी सोडत आहेत. मतदान जनजागृतीमध्ये त्यांच्या अमूल्य योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करत असल्याचे आयोगाने म्हटले आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील ‘मै अटल हूं’ हा त्रिपाठी यांची भूमिका असलेला चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, त्रिपाठी यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत राजकारणात (Politics) येण्याबाबत त्यांनी सुचक विधान केले होते. बिहारमध्ये सगळेच राजकारणी असल्याचे ते म्हणाले होते. त्रिपाठी हे बिहारमध्ये कॉलेजमध्ये असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य होते. त्यावेळी राजकारणात येण्याचा कधीच विचार केला नाही. पण आगामी चित्रपटामुळे पुन्हा एकदा राजकारणात रस असल्याचे त्यांनी सांगितले होते.
Actor Pankaj Tripathi Steps Down As Election Commission’s National Icon
Actor Pankaj Tripathi Election Commission National Icon
Actor Pankaj Tripathi Election Commission National Icon
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements