17 व्या पर्वात कोण विजयी ठरणार याची उत्सुकता
AB de Villiers predicts the winner of IPL 2024
आयपीएलमध्ये काही संघांचं जेतेपद जिंकण्याचं स्वप्न अजूनही अधुरंच आहे. त्यामुळे यंदातरी जेतेपद मिळावं यासाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. मिनी लिलावात याची झलक पाहायला मिळाली. ताकदीचे खेळाडू घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण करण्यात आली. आता जेतेपद कोण जिंकतं याची उत्सुकता आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे यशस्वी संघ आहेत. विराट कोहलीच्या आरसीबीला जेतेपद जिंकता आलेलं नाही. 3 वेळा अंतिम फेरीत प्रवेश करून रिकाम्या हाती परतावं लागलं. आता 17 व्या पर्वात आरसीबीकडून बऱ्याच अपेक्षा आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने मोठं भाकीत केलं आहे.
एबी डिव्हिलियर्सनने यंदाच्या जेतेपदासाठी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला पसंती दिली आहे. 17 व्या पर्वात आरसीबी जेतेपदावर नाव कोरेल असं त्याने ठामपणे सांगितलं आहे. त्यामुळे त्याचं भाकीत खरं ठरतं का? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
“मी प्रचंड आशावादी असून यावेळी आरसीबी संघ जेतेपद जिंकेल यात शंका नाही.”, असा विश्वास एबी डिव्हिलियर्सने व्यक्त केला आहे. 11 वर्षे आरसीबीकडून खेळणाऱ्या डिव्हिलियर्सने आरसीबीला अनेक सामने जिंकून दिले आहेत. 184 सामन्यात 5162 धावा केल्या आहेत.
एबी डिव्हिलियर्सने व्यक्त केलेलं भाकीत खरं ठरत का? पाहणं महत्त्वाचं ठरेल. टी20 वर्ल्डकपपूर्वी खरंच असं घडलं तर विराट कोहलीला दहा हत्तींचं बळ मिळेल. टी20 वर्ल्डकपमध्ये त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ : फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार दीपराज, मोहम्मद वैशाख, मोहम्मद अकादमी. , मोहम्मद सिराज, रीस टोपली, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरॉन ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करण, लकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.
AB De Villiers Predicts RCB IPL
AB De Villiers Predicts RCB IPL
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements