जर तुम्हाला विचारलं गेलं की, जगातील सगळ्यात जुनं अंडं किती वर्ष जुनं असू शकतं? तर तुम्ही यावर काय उत्तर द्याल. कुणी 100 वर्ष म्हणतील तर कुणी 200 वर्ष… पण हे बरोबर उत्तर नसेल. कारण आता जगातील सगळ्यात जुनं म्हणजे 1700 वर्ष जुनं अंडं सापडलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हे अंडं पूर्णपणे सुरक्षित आहे. इंग्लंडमध्ये एका प्राचीन वास्तुमध्ये खोदकाम सुरू होतं. तिथे हे अंडं सापडलं (eggs discovered in a Roman pit during a dig in Buckinghamshire). जे स्कॅन केल्यावर समजलं की, ते पूर्णपणे सुरक्षित आहे. इतक्या वर्षापासून सुरक्षित असलेल्या या अंड्याने सगळ्यांनाच अवाक् केलं आहे (1700-year-old Roman egg found).
इंग्लंडच्या बकिंघमशायरमध्ये ऐलिसबरीच्या बेरीफील्डमध्ये सापडलेल्या या रोमन युगातील अंड्याच्या आत आजही तरल पिवळा आणि पांढरा भाग कायम आहे (Ancient Roman egg discovered in Aylesbury, Buckinghamshire still had a yolk inside). हे स्कॅन करण्यात आलं तेव्हा समजलं की, हे अंडंं 1700 वर्ष जुनं आहे. हे पाण्याने भरलेल्या एका खड्ड्यात सापडलं. असं मानलं जात आहे की, याच कारणाने हे अंडं इतकी वर्ष सुरक्षित राहिलं. जेव्हा हे अंडं स्कॅन केलं तेव्हा त्यांना दिसलं की, अंडं आतून सुरक्षित आहे. डीजीबी कंजरवेशनच्या पुरातत्ववादी डॅना गुजबर्न ब्राउन म्हणाल्या की, या अंड्याच्या आत हवेचा एक बुडबुडाही आहे.
या बुडबुड्यामुळेच त्यांना समजलं की, आत तरल पदार्थ कायम आहे. त्यांना दिसलं की, अंडं हलवलं तर त्यातील बुडबुडाही हलतो. या ठिकाणी अशी चार अंडी सापडली आहेत. पण यातील तीन खोदकाम करताना फुटली. याआधीही अशा ठिकाणांवर अंडी सापडली. पण पहिल्यांदाच असं सुरक्षित अंडं सापडलं. अशाप्रकारच्या अंड्यामध्ये जैविक पदार्थही इतका काळ कामय राहू शकत नाही. पण हे फार अजब आहे. असं मानलं जात आहे की, कुणीतरी अंडं फार चांगल्याप्रकारे एका बास्केटमध्ये ठेवलं होतं. रोमन समाजात अंड्याला फार महत्व होतं.
1700-year-old Roman egg found
1700-year-old Roman egg found
1700-year-old Roman egg found
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310