सिंधुदुर्ग : कोकणचा हापूस आंबा जगप्रसिध्द आहेच. आता हापूस आंब्याच्या झाडाच्या पानानेही जागतिक रेकॉर्ड केले आहे. जगातील सर्वात मोठ्या हापूस आंब्याच्या झाडाच्या पानाची वर्ल्ड रेकॉर्डची नोंद कुडाळच्या चंद्रकांत काजरेकर यांच्या बागेतील आंब्याची झाली आहे. या रेकॉर्डने जगाच्या नकाशावर कुडाळचे नाव नोंदवले गेले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती आणि बागायतदार चंद्रकांत काजरेकर कुडाळ यांच्या हापूस आंब्याच्या झाडावर आलेले पान जगातील सर्वात मोठे हापूस आंब्याच्या झाडाचे पान म्हणून रेकॉर्ड झाले आहे. कुडाळचे सुपुत्र काजरेकर गिनीज बुक रेकॉर्ड होल्डर ठरले आहेत. निसर्गात अशा बऱ्याच वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी असतात पण त्या प्रकाशात आणणे महत्त्वाचे असते. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात प्रथम प्रशासन अधिकारी आणि नंतर अकाउंटंट व्यवस्थापक म्हणून सुमारे 32 वर्षे सेवा करून निवृत्त झाले.
यानंतर आपली आंबा आणि काजू बागायतीची आवड जोपासत असताना काजरेकर यांना आपल्या हापूस आंब्याच्या झाडावर आलेले पान खूपच लांब व रुंद असल्याचे आढळले. त्या पानाची लांबी व रुंदी त्यांनी मोजली. गुगलच्या सहाय्याने जगातील रेकॉर्ड पडताळून पाहिले. निरीक्षणानंतर त्यांना आढळले की हे जगातील रेकॉर्ड होऊ शकते (Worlds Largest Hapus Mango Leaf #Alphonso). या वैशिष्ट्यपूर्ण पानाला जागतिक रेकॉर्डच्या प्लॅटफॉर्मपर्यंत नेण्यासाठी त्यांनी आपली मुली डॉ. नालंदा आणि डॉ. नुपूर आणि जावई धीरज व डॉ. देवेन यांच्या मदतीने व चिकाटीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड या दोन ठिकाणी रिपोर्ट पाठविला.
त्यानंतर पूर्णतपासनीचे रेकॉर्ड तयार करताना संत राहुल महाराज महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डॉ. विलास झोडगे यांच्या सहकार्यामुळे महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या टीमची मदत मिळाली. महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. रवींद्र यशवंत ठाकुर, प्राध्यापक उमेश मिलिंद कामत आणि प्राध्यापक दयानंद विश्वनाथ ठाकूर यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक व चिकाटीने काम केले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि वल्डे वाईड बुक ऑफ रेकॉर्डच्या नियमानुसार वैशिष्ट्यपूर्ण पानाची मोजणी करणे, फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग वर रेकॉर्डिंग तसेच रिपोर्टिंग या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले. त्या कामात डॉ. दिपाली काजरेकर, डॉ. नालंदा, डॉ. नुपुर, जावई धीरज, डॉ. देवेंद्र तसेच आशीर्वाद फोटो स्टुडिओचे टीम यांचे सहकार्य लाभले.
जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड आणि वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड अशा दोन जागतिक रेकॉर्डची नोंद चंद्रकांत काजरेकर यांच्या नावे झाली. कुडाळ तालुका सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्य आणि इंडिया या सर्वांचे नाव जगाच्या नकाशावर नोंदवले गेले आहे. या पानाची लांबी 55.6 सेमी रुंदी 15.6 से.मी. आहे त्यापूर्वी त्यांनी प्रयोगशील शेतकरी म्हणून आपल्या शेती बागायतीत प्रयोग केले आहेत. कुडाळ येथील आपल्या राहत्या घराच्या टेरेसवर सुपारी व काजूची रोपे तयार करून नर्सरीचा यशस्वी प्रयोग केला आहे. तसेच तळवडे, सावंतवाडी येथील शेतात आपले बंधू विनोद काजरेकर यांच्या मदतीने भाताची एक काडी लागवड, लावणी, कापणी, मळणी इत्यादी यंत्राच्या साह्याने शेती करणे. दुर्मिळ वनौषधी लागवडी व संवर्धन यांचे यशस्वी प्रयोग केले आहेत.
Sindhudurga Guinness World Record Worlds Largest Hapus Mango Leaf Alphonso Mango
Worlds Largest Hapus Mango Leaf Alphonso Mango
Worlds Largest Hapus Mango Leaf Alphonso Mango
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements