Virat Kohli & BCCI | India Vs England Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील उर्वरित 3 कसोटी सामन्यांसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली. भारतीय कसोटी संघात विराट कोहली परतणार की नाही यावर अखेर पडदा पडला असून तो संपूर्ण मालिकेला मुकला आहे. बीसीसीआयने विराटबाबत एक वक्तव्य देखील प्रसिद्ध केलं. या वक्तव्यानुसार बीसीसीआयने विराट कोहलीच्या कुटुंबाला प्राधान्य देण्याच्या निर्णयाला पाठिंबाच दर्शवला आहे.
बीसीसीआयने विराट कोहली इंग्लंडविरूद्धच्या उर्वरित कसोटी मालिकेसाठी मुकणार असल्याचं जाहीर केलं. त्यावेळी त्यांनी एक वक्तव्य देखील प्रसिद्ध करत विराटच्या वैयक्तिक कारणासाठी मालिकेतून माघार घेण्याला समर्थन दिलं आहे. बीसीसीआयने आपल्या प्रेस रिलीजमध्ये सांगितले की, विराट कोहली हा कसोटी मालिकेतील सामन्यासाठी उपलब्ध असणार नाही. त्याने वैयक्तिक कारणामुळे मालिकेतून माघार घेतली. बीसीसीआय विराट कोहलीच्या निर्णयाचा आदर करत आणि त्याला समर्थन देखील देतं.
विराट कोहलीची इंग्लंडविरूद्धच्या मालिकेतील अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला होता. त्याने कोणत्या कारणाने मालिकेतून माघार घेतली हे स्पष्ट झाले नसल्याने त्याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या गेल्या. फॅमिली फर्स्टवर देखील टिकेचा सूर उठला होता. परदेशी खेळाडू विराटच्या निर्णयाचे समर्थन करत होते. मात्र बीसीसीआयने वक्तव्यच प्रसिद्ध करत विराट कोहलीच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा कोणताही इरादा नसल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. बीसीसीआयने विराटबाबत वक्तव्य देत खेळाडूंचे स्वास्थ हे क्रिकेट मालिकांपेक्षा जास्त महत्वाचे असेल याचे स्पष्ट संकेत दिले.
बीसीसीआयने 18 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडविरुद्ध राजकोट, रांची आणि धरमशाला येथे कसोटी सामने खेळले जाणार आहेत. विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघात कोणाला संधी मिळणार हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. विराटच्या जागेवर रजत पाटीदारला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
Virat Kohli Prioritizes Family Over Cricket
Virat Kohli Prioritizes Family Over Cricket
Virat Kohli Prioritizes Family Over Cricket
Virat Kohli Prioritizes Family Over Cricket
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements