रस्त्यावरून धावणाऱ्या कारमध्ये उभी राहून नाचतेय तरुणी;
Video Viral पाहून नेटकऱ्यांमध्ये पेटला वाद
Viral Video of woman dancing in convertible car : सार्वजनिक ठिकाणी जीव धोक्यात टाकून नाचतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये रस्त्यावरून धावणाऱ्या एका कारमध्ये एक तरुणी नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ दिल्लीमधील असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे (Viral Video). सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका व्हिडिओमुळे सार्वजनिक ठिकाणी कसे वर्तन करावे याबद्दल नेटकऱ्यांमध्ये वाद पेटला आहे.
व्हिडीओला ‘जस्ट दिल्ली थिंग्ज’, असे कॅप्शन दिलेले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, कशा प्रकारे कन्व्हर्टिबल कारमध्ये एक तरुणी उभी आहे. बिनधास्तपणे नाचताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही कार रस्त्यावरून धावत आहे. जीवाची पर्वा न करता ही तरुणी कारमध्ये उभी राहून नाचताना दिसत आहे.
तरुणीच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर त्वरीत व्हायरल झाला. व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या समिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहे. कोणाला हा व्हिडीओ मनोरंजक वाटाला, कोणाला आश्चर्यकारक वाटला. त्यामुळे काहींनी महिलेच्या डान्सचे कौतूक केले तर काहींनी तिच्यावर टिका केली. काहींनी तरुणी आनंदी आहे तिचा आनंद साजरा करत आहे असा युक्तीवाद केला तर काहींनी असा युक्तिवाद केला की, अशा कृतींमुळे सार्वजनिक सभ्यता आणि सुरक्षिततेबद्दल प्रश्न निर्माण होतात.
सार्वजनिक ठिकाणी असे नृत्य करणे योग्य आहे की नाही हा वादाचा मुळ मुद्दा आहे. विशेषत: चालत्या वाहनात नृत्य करण्याचे संभाव्य धोके लक्षात घेऊन ही टिका केली जात आहे. व्हिडिओ प्रसारित होत असताना, इंस्टाग्रामवरील वापरकर्त्यांनी आपली निराशा व्यक्त केली. एकाने कमेंट केली की, “किमान कोणीतरी स्वत:च्या आयुष्यात आनंदी आहे.” दुसऱ्याने लिहिले, “जेव्हा तिला क्लबमध्ये श्रीमंत मुलगा सापडतो.”
आणखी एकाने लिहिले की,” ती फक्त आनंद घेत आहे आणि गाण्यावर वाईब करत आहे!!तुम्ही इतके जजमेंटल का आहात? जर तुम्ही तुमच्या आयुष्यात समाधानी नसाल तर तुम्ही ती मुलगी असो वा मुलगा तिच्याकडे बोट दाखवाल. खरंच, मोठे व्हा!! आनंदी राहणे ही एक निवड आहे आणि ती तशीच राहू द्या. दुसऱ्याने म्हटले, “ती फक्त आनंद घेत आहे, मित्रा. काय चूक आहे, स्वत: जगा आणि इतरांना जगू द्या.”
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements