जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड म्हणून बीसीसीआय ओळखलं जातं. बीसीसीआय टीम इंडियातील खेळाडूंसाठी कोणतीच गोष्ट कमी पडू देत नाही. मात्र वर्ल्ड कप खेळलेल्या खेळाडूने गंभीर आरोप केल्याने Board of Control for Cricket in India (BCCI) वर उघडं पडण्याच वेळी आलीये. एका खेळाडूने गंभीर आरोप केला आहे की, त्याला जेव्हा संघाबाहेर केलं त्यावेळी तो दुखापती असल्याचं सांगितलं गेलं. मात्र तो दुखापती नव्हताच…. तरीही त्याच्याबाबत अफवा पसरवली गेली. हा आरोप करताना खेळाडूने ज्या कोणी अफवा पसरवली त्याचं नाव घेतलं नाही (Varun Chakravarthy alleges ‘someone spread fake injury news’ to sideline him).
मला संघामधून बाजूला करण्यासाठी ही अफवा पसरवली गेली होती. माझ्यावर अन्याय झाला…. पण यालाच आयु्ष्य म्हणत असल्याचं हा स्टार खेळाडू म्हणाला. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती आहे. वरुण चक्रवर्ती याची 2021 साली झालेल्या टी-20 संघामध्ये निवड झाली होती. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी विराट कोहली याच्याकडे होती (`It is unfair,` says India spinner Varun Chakravarthy on snub from team post 2021 T20 World Cup).
दरम्यान, आयपीएलमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्याची वर्ल्ड कप संघात निवड झाली होती. मात्र वर्ल्ड कपमधील फ्लॉप प्रदर्शनानंतर त्याला संघातून वगळण्यात आलं होतं. 2021 च्या टी-20 विश्वचषकात वरुण चक्रवर्ती टीम इंडियासाठी वाइल्ड कार्ड ठरेल अशी अपेक्षा होती. कोलकाता नाईट रायडर्सकडून 2020 आणि 2021 मध्ये त्याने अनुक्रमे 17 आणि 18 विकेट घेतले. या कामगिरीच्या जोरावर त्याची भारतीय टी-20 विश्वचषक संघात निवड झाली. मात्र, स्पर्धेदरम्यान दुखापत झाल्याने त्याला मायदेशात बोलवण्यात आले. या दुखापतीबाबत वरुण चक्रवर्तीने धक्कादायक खुलासा केला आहे. कोणीतरी माझ्या दुखापतीबाबत खोटी बातमी पसरवण्यात आल्याचा त्याने आरोप केला.
Varun Chakravarthy fake injury news
Varun Chakravarthy fake injury news
Varun Chakravarthy fake injury news
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements