हॉलीवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या आगळ्या वेगळ्या धाटणीच्या गायकीसाठी ओळखला जाणाऱ्या टोबी किथचं निधन झालं आहे. कॅन्सरनं त्याचा मृत्यू झाल्याचे (Toby Keith, chart-topping American country singer, dies aged 62) सांगण्यात येत आहे. त्याच्या जाण्यानं हॉलीवूडवर मोठी शोककळा पसरली आहे.
टोबीच्या गाण्यांची जादू ही त्याच्या चाहत्यांच्या मनावर कायम आहे. वयाच्या अवघ्या 62 व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या टोबीच्या जाण्यानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तो गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्याला पोटाचा कर्करोग झाला होता. टोबीच्या निधनानंतर हॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी त्याला आदरांजली वाहिली आहे.
अमेरिकन पॉपस्टार म्हणून टोबीची वेगळी ओळख होती. तो त्याच्या वेगळ्या गाण्यांसाठी नेहमीच चर्चेत राहिला. त्याची गायकी, वेगळं सादरीकरण यामुळे त्याचा चाहतावर्गही मोठा होता. सोशल मीडियावर त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आता टोबीच्या जाण्याची बातमी ऐकताच सोशल मीडियावर त्याच्या असंख्य चाहत्यांनी त्याला आदरांजली वाहिली आहे. टोबीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन त्याच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे.
टोबीच्या करिअरविषयी सांगायचे झाल्यास, 90च्या दशकांतील या गायकानं त्याच्या वेगळ्या शैलीमुळे मोठी लोकप्रियता मिळवली होती. त्याचं पहिलं गाणं शुड हॅव बीन ए काऊबॉय हे खूपच लोकप्रिय झाले होते.वेगवेगळ्या देशांमध्ये ते आवडीनं ऐकलं जात होतं. त्यानंतर 99 साली आलेल्या हाऊ डू यू लाईक मी नाऊ या गाण्यानं मोठी लोकप्रियता मिळवली होती. टोबीच्या वेगवेगळ्या अल्बमची 40 मिलियनपेक्षा जास्त विक्री झाल्याचे सांगण्यात येते. त्याच्या जाण्यानं हॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे.
पोटाच्या कॅन्सरची सुरुवात सामान्यपणे पोटातील म्यूकस प्रोड्यूस करण्यासाठी सेल्सपासून सुरुवात होते. तसं पाहायला गेलं तर पोटाचा कॅन्सर इतर कॅन्सरच्या तुलनेमध्ये फारसा कॉमन नाही. परंतु, सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, याची लक्षणं चटकन लक्षात येत नाहीत. जेव्हा लक्षात येतात तेव्हा वेळ हातातून निघून गेलेली असते.
का होतो पोटाचा कॅन्सर? : सामान्यपणे कॅन्सरची सुरुवात डीएनएमधील पेशींमध्ये म्यूटेशन तयार होतात तेव्हा होते. या म्यूटेशनमुळे पेशी अनियंत्रित होतात आणि वाढतात. या पेशी एवढ्या वाढतात की, त्यामुळे नॉर्मल पेशी मृत पावतात. या पेशी एकत्र येऊन ट्यूमर तयार होतो. जो शरीराच्या दुसऱ्या भागांपर्यंत जाऊन पोहोचतो.
पोटाच्या कॅन्सरची सामान्य लक्षणं :
1. सतत उलट्या होणं आणि अस्वस्थ वाटणं
2. सतत छातीमध्ये जळजळ होणं
3. भूक कमी लागणं किंवा अचानक वजन कमी होणं
4. सतत पोट फुगणं
5. थोडसं खाल्यानंतर पोट भरणं
6. विष्ठेवाटे रक्त येणं
7. कावीळ होणं
8. सतत थकवा येणं
9. पोटामध्ये वेदना होणं किंवा काही खाल्यानंतर वेदना वाढणं
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येकवेळी असं गरजेचं नाही की, ही लक्षणं पोटाच्या कॅन्सरमुळेच होतील. अनेकदा ही लक्षणं साधारण समस्यांवरून होऊ शकतात. पण जर ही लक्षणं वाढली तर मात्र त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
US country singer Toby Keith dies
US country singer Toby Keith dies
US country singer Toby Keith dies
US country singer Toby Keith dies
US country singer Toby Keith dies
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements