बेळगाव -वेंगुर्ला मार्गावर धुमडेवाडी (ता. चंदगड, कोल्हापूर) फाट्यानजीक दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघे जागीच ठार झाले. सुरेश रामू पाटील (वय 50, रा. निट्टूर) व भगवान आनंद सदावर (38, रा. सदावरवाडी) अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला.
सुरेश पाटील हे अथर्व-दौलत कारखान्यावर उसाचे भरलेले ट्रॅक्टर अड्ड्यात लावून घरी जात होते, तर भगवान सदावर आपल्या दुचाकीवरून पाटणे फाट्यावरून सदावरवाडी गावाकडे जात होता. धुमडेवाडी फाट्यानजीकच्या वळणाचा अंदाज आला न आल्याने दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली.
दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. जोरदार धडकेत दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, धुमडेवाडी फाट्यानजीकच्या वळणावर यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. हे वळण काढण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.
Two killed in an accident on Belgaum-Vengurla roadTwo killed accident on Belgaum-Vengurla road
Two killed accident on Belgaum-Vengurla road
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements