Sambhar Salt Lake, India’s largest inland salt lake
Aerial Video Of Train Passing Through Sambhar Salt Lake
Video : राजस्थान हे विविध कला संस्कृतींनी नटलेले राज्य आहे. राजस्थान राज्यातील जयपूर जिल्ह्यात भारतातील सर्वांत मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. राजस्थान राज्याच्या पूर्वमध्य भागातील नागौर व जयपूर या जिल्ह्यांत त्याचा विस्तार असून अजमेर जिल्ह्याची सरहद्द सरोवराला येऊन भिडली आहे. हे सरोवर सांभर सरोवर या नावाने प्रसिद्ध आहे. दरम्यान, हजारो वर्षांपासून हे सरोवर मीठ उत्पादनासाठी प्रसिद्ध असल्याने या सरोवराला सांभर (अर्थ खाऱ्या जमिनीपासून काढलेले मीठ) असे नाव आहे. याच सरोवराजवळून भारतीय रेल्वे धावताना दिसते.
Scenic rail journey over India's largest inland salt lake.
📍Rajasthan pic.twitter.com/ibiq9rwFWW
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) February 14, 2024
दरम्यान, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांभर सरोवराजवळून धावणाऱ्या रेल्वेचा एक सुंदर, जबरदस्त व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यामध्ये निसर्गाच्या सुंदर, अनोख्या छटा पाहायला मिळत आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहो, जो ट्रॅव्हल फोटोग्राफर राज मोहनने शूट केला आहे. रेल्वेमंत्र्यांनी हा व्हिडीओ शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिले की, भारतातील सर्वांत मोठ्या अंतर्देशीय मिठागरावरील एक सुंदर रेल्वे प्रवास….
दरम्यान, सांभर सॉल्ट लेक हे भारतातील सर्वांत मोठे मिठाचे सरोवर आहे; जे पूर्व-मध्य राजस्थानमध्ये आहे. निसर्गप्रेमींसाठी ही एक सुंदर जागा आहे. दुरून बर्फासारखी दिसणारी ही उंच मिठागरे सरोवराच्या सौंदर्यात आणखी भर घालतात. सहसा उन्हाळ्यात येथील वातावरण कोरडे असते. ब्रिटानिकाच्या मते, हे तलाव पारंपरिकपणे सहाव्या शतकात देवी शाकंबरीने तयार केले, असे म्हटले जाते; जी शिवाची पत्नी होती. सरोवराचे मीठ मुघल राजघराण्यानेदेखील पुरवले होते आणि नंतर ते जयपूर व जोधपूर या संस्थानांच्या संयुक्त मालकीचे होते.
दुर्गादेवीचा अवतार असणार्या शाकंभरी देवीने (शिवाची पत्नी) येथील दाट जंगलाचे रुपांतर रुपेरी मैदानात केले. ही घटना हितकारक न होता, धनाच्या लोभाने लोकांमध्ये आपापसात झगडे होतील, या भीतीपोटी स्थानिक रहिवाशांनी या रुपेरी मैदानाचे खार्या पाण्याच्या सरोवरात रुपांतर व्हावे, अशी देवीकडे प्रार्थना केली. तेव्हा देवीने प्रसन्न होऊन, या ठिकाणी सरोवराची निर्मिती केली. त्यामुळे या सरोवरास सांभर असे नाव देण्यात आले. सांभर हे शाकंभरीचे अपभ्रंश रूप असावे, असे मानतात. ही घटना इ. स. सहाव्या शतकात घडली असल्याचे मानले जाते. हिंदू परंपरेनुसार, शाकंभरी ही चौहान-राजपूतांची रक्षणकर्ती देवी असल्याचे मानले जाते. शाकंभरी देवीचे मंदिरही येथे आहे. महाभारतातील उल्लेखानुसार राजा ययाती व देवयानी (राक्षसगुरू शुक्राचार्यांची मुलगी) यांचा विवाह येथे झाल्याचे मानले जाते. सरोवराजवळ देवयानी मंदिर व देवयानी नावाचा तलाव आहे.
Aerial Video Of Train Passing Through Sambhar Salt Lake
Aerial Video Of Train Passing Through Sambhar Salt Lake
Aerial Video Of Train Passing Through Sambhar Salt Lake
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements