ICC Men’s T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कप 2024 ची तयारी जवळपास सगळ्या संघांनी सुरू केली आहे. क्रिकेटची सर्वात मोठी ICC टूर्नामेंट वर्ल्ड कप या वर्षी जून महिन्यात खेळला जाणार आहे. वर्ल्ड कपचा पहिला सामना 1 जून रोजी होणार आहे. याशिवाय या स्पर्धेचा अंतिम सामना 29 जून रोजी होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपपूर्वी भारतीय क्रिकेट संघात अनुभवी खेळाडू युवराज सिंगला संघात मोठी जबाबदारी मिळू शकते.
Yuvraj Singh हा भारतातील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. युवराज सिंगने 2017 मध्ये भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला आणि त्याने 10 जून 2019 रोजी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र आता त्याने पुन्हा टीम इंडियामध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारतीय संघ गेल्या 11 वर्षांपासून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. भारताने शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 मध्ये जिंकली होती. यानंतर भारताने अनेकवेळा फायनल किंवा सेमीफायनल गाठली आहे, पण एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही.
अशा स्थितीत भारतीय संघाने दडपणाखाली खेळण्याची सवय लावायला हवी. त्यामुळे भारताचा अनुभवी खेळाडू आणि 2-2 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा खेळाडू युवराज सिंग ही जबाबदारी पार पाडू शकतो. भारतीय संघातील खेळाडू खूप चांगले आहेत, पण ते दडपण सहन करू शकत नसल्याचे खुद्द युवराज सिंगने म्हटले आहे. भारताच्या एक-दोन खेळाडूंनी दडपण सहन केले तर काहीही होणार नाही, भारतीय संघ तेव्हाच जिंकेल जेव्हा सर्व खेळाडूंमध्ये दबावाखाली चांगली कामगिरी करण्याची क्षमता असेल.
तो पुढे म्हणाला की, मला माझा अनुभव भारताच्या युवा खेळाडूंना द्यायचा आहे. माझी मुलं मोठी झाल्यावर मी क्रिकेटला वेळ देऊ इच्छितो आणि खेळाडूंना दबावाखाली खेळायला शिकवू इच्छितो. युवराज सिंगला स्वतः भविष्यात भारतीय संघासोबत काम करायचे आहे. अशा परिस्थितीत युवराज सिंगला टी-20 वर्ल्ड कपमध्ये मेंटॉर म्हणून संघात समाविष्ट केले जाऊ शकते किंवा त्याच्यावर मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते.
T20 World Cup Yuvraj Singh
T20 World Cup Yuvraj Singh
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310