T20 World Cup IND vs PAK सामन्याच्या पोस्टरवर हार्दिक पांड्याचा फोटो
T20 World Cup IND vs PAK : आयसीसीने काल टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी सर्व संघांच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानंतर कोणत्या संघाचा सामना कोणत्या दिवशी आणि कोणत्या संघासोबत होणार हे स्पष्ट झाले.
त्यानुसार टीम इंडिया 5 जूनपासून T20 World Cup 2024 मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडशी होणार आहे आणि हा सामना न्यूयॉर्कमध्ये आहे. याशिवाय भारतीय संघाचा पुढील सामना 9 जून रोजी पाकिस्तानसोबत होणार आहे. आता स्टार स्पोर्ट्सने भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी मॅच पोस्ट जारी केली आहे. या पोस्टमध्ये दोन्ही संघांचे कर्णधार दाखवले आहेत. हे पोस्टर समोर आल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.
Star Sports poster for India Vs Pakistan T20 World Cup match. pic.twitter.com/7tndrKPUqD
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 5, 2024
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याआधी दोन्ही संघांचे कर्णधार असलेले पोस्टर स्टार स्पोर्ट्सने शेअर केले आहे. त्यात रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला भारतीय संघाचा कर्णधार म्हणून दाखवण्यात आला आहे. ही पोस्ट समोर आल्यानंतर सोशल मीडियावर युजर्सकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत की, हार्दिक पांड्या टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाचा कर्णधार असेल का?
दुसरीकडे, हार्दिक पांड्या अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि त्याच्या संघात पुनरागमनाबाबत कोणतीही अपडेट नाही. गेल्या एक वर्षापासून हार्दिक पांड्या टी-20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवत आहे. मात्र आता हार्दिक दुखापतीमुळे संघाबाहेर आहे आणि 11 जानेवारीपासून अफगाणिस्तानसोबत होणाऱ्या टी-20 मालिकेत रोहित शर्मा एकदाच कर्णधार असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे (T20 World Cup IND vs PAK).
यावेळी अमेरिका आणि वेस्ट इंडिज 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपचे यजमानपद भूषवणार आहेत. टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाला अ गटात ठेवण्यात आले आहे. पहिल्या गटात भारतीय संघासह पाकिस्तान, आयर्लंड, अमेरिका आणि कॅनडा या संघांना स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघाचा पहिला सामना आयर्लंडशी होणार आहे. टीम इंडियाला ग्रुप स्टेज मॅचमध्ये पाकिस्तानकडून कडवी टक्कर द्यावी लागू शकते.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements