बेळगाव—belgavkar : एका घराचे सेंट्रींग काम करीत असताना विद्युत भारित तारेच्या स्पर्शाने बेळगाव तालुक्यातील सोनोली गावच्या सेंट्रींग कामगाराचा मृत्यू झाला आहे. नरेवाडी (तालुका चंदगड, कोल्हापूर) येथे सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. रघुनाथ नारायण पाटील (वय 54, रा. सोनोली) असे त्या कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे सोनोली गावावर शोककाळा पसरली आहे.
रघुनाथ पाटील हे सेंट्रींगचे कामकाज करीत होते. या सेंट्रींग व्यवसायामध्ये त्यांनी चांगलाच जम बसविला होता. नरेवाडी येथील शेत शिवारामध्ये त्यांचे काम सुरू होते. एका घरावर सेंट्रींगचे काम करीत असताना, लोखंडी बार घेऊन ते जात होते. याचवेळी सर्विस विद्युत भारित तारेचा स्पर्श सदर लोखंडी बारला झाला. त्यामुळे त्यांना विद्युत पुरवठ्याचा तीव्र झटका बसला आणि ते खालीच पडले.
यावेळी सदर घरावर काम करणार्या अन्य कामगारांना काहीच कळाले नाही. लागलीच त्यांना कारवे येथील एका खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना बेळगावमधील KLE हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचारासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान ते मृत्यू पावले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ-बहीण असा परिवार आहे. रघुनाथ यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या घरच्या सदस्यांनी एकच आक्रोश केला होता.
Belgaum Sonoli centering worker dies electrocuted belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Sonoli centering worker dies electrocuted
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310