आजुबाजूला शेत आणि मधोमध घर, भलामोठा गेट…
स्मृती इराणी यांच्या घराची पहिली झलक
भारताच्या राजकीय वर्तुळामध्ये स्मृती इराणी हे नाव नवं नाही. कलाजगताकडून राजकारणाकडे वळलेल्या आणि या विश्वात पाय घट्ट रोवून उभ्या आहेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी. माहितीनुसार स्मृती इराणी चर्चेत येण्यामागचं कारण आहे सोशल मीडियावर व्हायरल होणारे त्यांच्या घरांचे फोटो. उत्तर प्रदेशातील अमेठी येथे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या नव्या घराचं बांधकाम पूर्ण झालं आहे (Smriti Irani House). अमेठीतील इराणी यांच्या या नव्या घरात सध्या काही शेवटची, लहानसहान कामं पूर्ण करण्यासाठीची लगबग सुरु असून, इथं लवकरच गृहप्रवेश केला जाणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.
खुद्द स्मृती इराणी या नव्या घरात राहणार असल्याचं सांगितलं जात अलल्यामुळं सध्या भाजप समर्थक आणि कार्यकर्त्यांसोबत अमेठीतील नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. 2019 च्या निवडणुकीदरम्यान इराणी यांनी अमेठीतील नागरिकांना आपण इथं लवकरच घर उभारू असा शब्द दिला होता. ज्यानंतर त्यांनी तेथील गौरीगंज भागातील एका माळरानावर असणारा भूखंड खरेदी केला (Smriti Irani House).
या भूखंडावर भूमीपुजनानंतर इराणी यांच्या कुटुंबीयांकडून घर उभारणीसाठीच्या प्रक्रियेचा श्रीगणेशाही करण्यात आला होता. ही संपूर्ण प्रक्रिया आता पूर्ण झाली असून, हे घर इराणी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रवेशासाठी सज्ज आहे. अमेठीतील नागरिकांना आता त्यांच्या नेतेमंडळींना भेटण्यासाठी दिल्ली गाठावी लागणार नाही, असं वचन इराणी यांनी स्थानिकांना दिलं आणि अखेर त्यांनी हा शब्द पाळला. कारण, इथून पुढं त्या या नव्या घरातही वास्तव्यास येणार असून, स्थानिकांच्या समस्या निवारण करण्याचे प्रयत्न करताना दिसणार आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो पाहता हे घर अतिशय मोठं असून, त्याचं प्रवेशद्वारही लक्ष वेधणारं आहे. भलंमोठं घर, तितकंच मोठं प्रवेशद्वार, आजुबाजूला दिसणारी शेती पाहता या घराचं Location सुद्धा कमाल आहे हे पाहताक्षणी लक्षात येतंय. स्मृती इराणी त्यांच्या या नव्या घरात वास्त्व्यासाठी येणार असून, इथूनच अमेठी मतदार संघातून आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं जात आहे.
इथूनच त्या निवडणुकीची रणनिती आखणार असून, इथंच जनता दरबार भरवून स्थानिकांच्या समस्यांचं निवारणही करणार आहेत. त्यामुळंच आगामी निवडणूक, भविष्यातील इराणी यांची राजकीय कारकिर्द पाहता हे नवं घर अतिशय खास आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
Smriti Irani House
Smriti Irani House
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements