हिवाळ्यात आढळणारी खूप पौष्टिक भाजी
Benefits of Shalgam : हिवाळ्यात येणाऱ्या अनेक भाज्या या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. अशीच एक भाजी म्हणजे शलजम. फिकट गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची ही Turnip (Shalgam) भाजी अतिशय पौष्टिक आहे. विशेष म्हणजे शलजम (Turnip) ही अतिशय चविष्ट आणि सहज उपलब्ध होणारी भाजी आहे. शलजम हे सॅलड, भाजी किंवा त्याची पानांची देखील भाजी केली जाते. शलजममध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. सलजममध्ये अ, ब, क, ई आणि के जीवनसत्त्व आढळतात. यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम देखील मुबलक प्रमाणात असतात. थंडीच्या दिवसात सलगम खाल्ल्याने अनेक फायदे होतात.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत : शलजममध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटीडायबेटिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. एका संशोधनानुसार, सलगममध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स आढळतात ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. Shalgam हा फायबरचा चांगला स्रोत आहे. हे खाल्ल्याने तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते. यामुळे जास्त भूक लागत नाही. सलाड आणि भाजी म्हणून सलगम वापरल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. तुमच्या आहारात नियमितपणे याचा समावेश करा.
Shalgam Turnip Vegetable
कॅन्सरचा धोका कमी करते : शलजममध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात. जे कर्करोगापासून आपला बचाव करतात. शलजमची भाजी फक्त धोका कमी करू शकते. कर्करोग कमी करू शकत नाही.
रक्तदाब नियंत्रित करते : शलजममध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. ज्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. सलगममध्ये आढळणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
डोळ्यांसाठी फायदेशीर : शलजममुळे डोळे निरोगी राहण्यास मदत होते. शलजममध्ये व्हिटॅमिन ए आणि इतर पोषक तत्व चांगल्या प्रमाणात असतात जे डोळे मजबूत करतात. शलजमच्या पानांमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन ही दोन संयुगे आढळतात जी डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगली असतात.
Turnip is a root vegetable, which is very low in calorie content. It is a storehouse of vitamins, minerals, fibre, and antioxidants. turnip contain high levels of sulforaphane that helps to fight the oxidative stress, and reduce the risk of cancer.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements