In The Name Of God 1992 Documentary
एका रेस्तरॉमध्ये ‘राम के नाम’ डॉक्युमेंट्रीचे स्क्रीनिंग केल्याप्रकरणी तेलंगणाच्या रचाकोंडा येथील 3 व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. नेरेदमेत पोलीस स्टेशनमध्ये धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणात आयपीसीच्या २९५-A कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरुन एमआयएम प्रमुख असदुद्दीन औवैसी यांनी टीका केली आहे.
एएनआयनुसार, राम मंदिराच्या उद्घाटनाआधी धार्मिक तणाव निर्माण होण्याच्या हेतूने डॉक्युमेंट्री दाखवण्यात येत होती. त्यामुळे एफआयआर दाखल करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केलाय. असदुद्दीन औवैसी यांच्या दाव्यानुसार, स्क्रीनिंग अर्ध्यातच थांबवण्यात आली आणि 3 लोकांना अटक करण्यात आली आहे (screening of ‘Ram Ke Naam’ documentary).
Hyderabad police halt screening of ‘Ram Ke Naam’ documentary, arrest three members of movie club
Ram ke Naam – a famed documentary on the Babri Masjid demolition by Anand Patwardhan– at a cafe in Sainikpuri, Hyderabad
screening of ‘Ram Ke Naam’ documentary
एक पुरस्कार प्राप्त डॉक्युमेंट्री पाहणं गुन्हा कसं असू शकतं? जर हा गुन्हा असेल तर भारत सरकार आणि फिल्मफेअर यांना देखील या डॉक्युमेंट्रीला पुरस्कार दिल्याप्रकरणी तुरुंगवास व्हायला हवा. स्क्रीनिंग करण्याआधी सरकारची परवानगी मिळालेले सर्टिफिकेट घ्यावे लागणार आहे का?, अशी टीका ओवैसी यांनी केली आहे. त्यांनी याप्रकरणी एक्सवर पोस्ट केली आहे.
राम के नाम किंवा In the Name of God ही डॉक्युमेंट्री १९९२ मधील राम मंदिर आंदोलनाप्रकरणी आहे. बाबरी मशीद पडणे आणि त्यानंतर झालेल्या दंगली यावर यामध्ये भाष्य केलेलं आहे. अनेकांच्या मुलाखतीत यात घेण्यात आल्यात. प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांनी बनवलेल्या या डॉक्युमेंट्रीला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण आणि राम लल्लाची प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राम मंदिरात अद्भूत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील जवळपास आठ हजार मान्यवरांना सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. सोहळा अभूतपूर्व होईल अशा प्रकारची तयारी अयोध्येमध्ये करण्यात आलीये. शिवाय देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय.
Ayodhya Ram Mandir : सध्या तंबूमध्ये असलेली श्रीरामांची जुनी मूर्ती नवीन गाभाऱ्यात…
screening of ‘Ram Ke Naam’ documentary
screening of ‘Ram Ke Naam’ documentary
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements