बेळगाव—belgavkar : संकेश्वर : संकेश्वर नगरपालिकेवर मंगळवारी बेळगाव येथील लोकायुक्त पथकाने छापा टाकून कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी केली. दिवसभर कर्मचारी वर्गास कार्यालयातून बाहेर सोडण्यात आले नव्हते. कार्यालयातच चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी 1 च्या सुमारास लोकायुक्त पथकाने नगरपालिका आवारात प्रवेश करत कार्यालयातील कामकाजाची माहिती घेण्यास सुरुवात केली. यामुळे कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.
पालिकेतील कामकाजाच्या कागदपत्रांची विभागवार पडताळणी करण्यात आली आहे. मात्र, लोकायुक्तांच्या छाप्यात नेमके काय घबाड हाती लागले, याचा तपशील मात्र समजू शकला नाही. सायंकाळी 6 च्या सुमारास लोकायुक्त पथक नगरपालिका कार्यालयातून बाहेर पडले. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकायुक्तांनी संकेश्वर नगरपालिका कार्यालयावर छापा टाकल्याने शहरात उलटसुलट चर्चा रंगली आहे. मात्र, या छाप्याबाबत माहिती समजली नाही. तसेच पत्रकारांनाही माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दर्शवला.
Sankeshwar Municipality Raided by Lokayukta team Belgaum
Sankeshwar Municipality Raided by Lokayukta team Belgaum
Sankeshwar Municipality Raided by Lokayukta team Belgaum
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements