ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांच्या प्रेमात तर पडलाच, पण तो
‘मास्टरब्लास्टर’ क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar Video) ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांच्या प्रेमात तर पडलाच, पण तो आता ‘बर्डमॅन’ अशी ओळख असणाऱ्या ताडोबातील सुमेध वाघमारेच्यादेखील प्रेमात पडला आहे (Video Birdman). 5 जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिन होता आणि यानिमित्ताने सचिनने ‘एक्स’वर त्या दोघांची चित्रफीत शेअर केली.
भारतात सुंदर आणि वैविध्यपूर्ण वन्यजीव आहेत. पक्षी आणि प्राण्यांबद्दल, त्यांच्या जवळ राहणाऱ्या लोकांकडून ऐकणे आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी आयुष्य समर्पित करणे, ही एक मेजवानी आहे. बर्डमॅन सुमेध वाघमारे यांनी “मेरी आवाज ही पहले है” ही ओळ साकारली आहे, असे सांगून सचिनने सुमेधसोबत साधलेल्या उल्लेखनीय संवादाची चित्रफीत सामायिक केली आहे. यात सुमेधने विविध पक्ष्यांच्या आवाजाची ‘सिम्फनी’ उलगडून दाखवली आहे.
India has a beautiful and diverse wildlife. To hear about birds and animals, from people living close to them and having dedicated their lives to studying them, is a treat!
Birdman Sumedh Waghmare embodies the line “Meri aawaz hi pehchan hai”. #NationalBirdDay pic.twitter.com/UNBem24KbB
— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 5, 2024
पक्ष्यांच्या आणि इतर प्राण्यांच्या विविध आवाजांची नक्कल करण्याबाबत सुमेधमध्ये अद्वितीय प्रतिभा आहे. व्याघ्रदर्शानंतर रिसॉर्टवर परतताना सचिन आणि सुमेधची भेट झाली. त्याचे कौतुक करत त्याला भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर याचा आवाज काढण्याची विनंती केली. यानंतर सचिनला राहावले नाही आणि रानकोंबडी, कोकिळा तसेच वाघ, बिबट आसपास असल्यानंतर सांबर, माकड एकमेकांना जागरुक करण्यासाठी काढत असलेले आवाज, अशा एकापेक्षा एक आवाजाची मेजवानी सुमेधने सचिनला दिली. आपल्या ट्विटमध्ये सचिन तेंडुलकरने भारतातील सुंदर आणि वैविध्यपूर्ण वन्यजीवांबाबत अभिमान व्यक्त केला आहे.
Sachin Tendulkar Video Birdman
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310