These rules will change from March 1, they will have a direct impact on your money : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी पैशाशी संबंधित असे अनेक नियम बदलत असतात. ज्यांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होतो. 1 मार्च 2024 पासून अनेक नियम बदलणार आहेत. फास्टॅग ते जीएसटी असे अनेक नियम उद्यापासून बदलणार आहेत. जाणून घेऊया या नियमांबद्दल.
एलपीजी किंमत : एलपीजीच्या किंमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला निश्चित केल्या जातात. तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती निश्चित करतात. कंपन्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती वाढवतील अशी अपेक्षा आहे. 14.2 किलो घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा दर दिल्लीत 1053 रुपये, मुंबईत 1052.50 रुपये, बेंगळुरूमध्ये 1055.50 रुपये, चेन्नईमध्ये 1068.50 रुपये आहे.
सोशल मीडियाचे नवीन नियम : सरकारने अलीकडेच आयटी नियमांमध्ये बदल केले आहेत. X, Facebook, YouTube आणि Instagram सारख्या सोशल मीडिया ॲप्सना हे नियम पाळावे लागतील. मार्च महिन्यापासून सोशल मीडियावर चुकीच्या माहितीसह कोणतीही बातमी प्रसारित झाल्यास त्यासाठी दंड आकारला जाऊ शकतो. सोशल मीडिया सुरक्षित ठेवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.
जीएसटी नियमांमध्ये बदल : केंद्र सरकारने GST नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. 1 मार्च 2024 पासून GST नियम बदलत आहेत. आता 5 कोटींहून अधिक व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना ई-इनव्हॉइसशिवाय ई-बिल तयार करता येणार नाही. शुक्रवारपासून हा नियम लागू होणार आहे.
बँकांना 13 दिवस सुट्ट्या : मार्चमध्ये 14 दिवस बँका बंद राहतील. या 14 दिवसांच्या सुट्यांमध्ये सर्व रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार देखील समाविष्ट आहे. म्हणजेच साप्ताहिक सुटी व्यतिरिक्त सणासुदीमुळे आठ दिवस बँका बंद राहणार आहेत. देशातील सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी 14 दिवस बँका बंद राहणार नाहीत. या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी असतील. ज्या राज्यांमध्ये सुट्ट्या आहेत त्या राज्यांमध्येच बँका बंद राहतील. मार्च महिन्यात शिवरात्री, होळी आणि गुड फ्रायडे असे सण असल्याने बँका बंद राहणार आहेत.
फास्टॅग : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) फास्टॅगचे KYC अपडेट करण्याची अंतिम तारीख 29 फेब्रुवारी निश्चित केली आहे. म्हणजेच आजच तुमच्या फास्टॅगचे केवायसी पूर्ण करा. अन्यथा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तुमचा फास्टॅग निष्क्रिय करू शकतात किंवा ब्लॅकलिस्ट करू शकतात.
आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, मार्चमध्ये अनेक दिवस बँकांना सुट्ट्या आहेत. मार्च महिन्यात 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर तुम्ही वेळेत करुन घ्या.
1 मार्च 2024: मिझोराममध्ये छपचार कुटच्या निमित्ताने बँका बंद राहतील.
3 मार्च 2024: रविवारी देशभरात बँका बंद राहतील.
8 मार्च 2024: महाशिवरात्री असल्याने त्रिपुरा, मिझोराम, तामिळनाडू, सिक्कीम, आसाम, मणिपूर, इटानगर, राजस्थान, नागालँड, पश्चिम बंगाल, नवी दिल्ली, गोवा, बिहार आणि मेघालय वगळता देशभरात बँका बंद राहतील.
9 मार्च 2024: महिन्याच्या दुसऱ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
10 मार्च 2024: रविवारी देशभरात बँका बंद राहतील.
17 मार्च 2024: रविवारी देशभरात बँका बंद राहतील.
22 मार्च 2024: बिहार दिनानिमित्त बिहारमधील बँका बंद राहतील.
23 मार्च 2024: महिन्याच्या चौथ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
25 मार्च 2024: होळी / धुलेती / डोल जत्रा / धुलंडीच्या निमित्ताने अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
26 मार्च 2024: Yaosang दुसरा दिवस/होळी बँका Yaosang मुळे अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
27 मार्च 2024: बिहारमध्ये 27 मार्चला होळीच्या निमित्ताने बँका बंद राहतील.
29 मार्च 2024: गुड फ्रायडे निमित्त, त्रिपुरा, आसाम, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर आणि हिमाचल प्रदेश वगळता देशभरात बँका बंद राहतील.
31 मार्च 2024: रविवारी देशभरात बँका बंद राहतील.
rules will change from March 1
rules will change from March 1
rules will change from March 1
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements