82 वर्षे जुन्या कंपनीची रिलायन्सकडून खरेदी
छोट्या दोस्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जिओच्या माध्यमातून देशभरात क्रांती घडवणाऱ्या अंबांनीनी आता चॉकलेट व्यवसायात लक्ष घातलंय. हो. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी आता चॉकलेट विकण्याच्या व्यवसायातदेखील उतरणार आहे. हा ग्रुप आता पान पसंद आणि कॉफी ब्रेक चॉकलेट विकणार आहे. रिलायन्सने आपल्या साम्राज्याचा विस्तार करत आणखी एक कंपनीची डील क्रॅक केली आहे (Reliance Consumer Products acquires Ravalgaon’s confectionery brands for Rs 27 crore).
एका नव्या करारानुसार रिलायन्स रिटेलची एफएमसीजी कंपनी रिलायन्स कंज्युमर प्रोडक्टने रावळगाव शुगर फार्मच्या कन्फेशनरी व्यवसायाचे अधिग्रहण केले आहे. या कराराअंतर्गत महाराष्ट्रातील रावळगाव शुगर फार्मचा ट्रेडमार्क, रेसिपीज आणि इंटलॅक्च्युयल प्रॉपर्टीचे अधिकार रिलायन्सकडे आले आहेत. ही 27 कोटी रुपयांची डील आहे.
काय आहे रावलगावातील मिठाई व्यवसाय
1933 मध्ये उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील रावळगाव गावात साखर कारखान्याची स्थापना केलेली. तर 1942 मध्ये कंपनीने रावळगाव ब्रँड अंतर्गत टॉफी बनवण्यास सुरुवात केली असून आज या कंपनीचे पान पासंद, मँगो मूड आणि कॉफी ब्रेक असे नऊ ब्रँड आहेत.
एका नव्या करारानुसार रावळगाव ब्रॅण्डमुळे रिलायन्स कंज्युमरच्या एफएमसीजी पोर्टफोलियोमध्ये वाढ होणार आहे. यामध्ये कॅम्पा, टॉफीमन आणि रस्किक सारख्या ब्रांडचा समावेश आहे. यामुळे ग्राहकांना जास्तीत जास्त प्रोडक्ट मिळू शकणार आहेत. 82 वर्षे जुन्या रावळगाव ब्राण्डकडे पान पसंद आणि कॉफी ब्रेक सारखे 9 कन्फेशनरी लेबल आहेत. एफएमसीजी कंपन्यांच्या स्पर्धेत आपली पकड मजबूत करण्यासाठी खूप मोठी स्पर्धा आहे. हे पाहता रिलायन्सकडून प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवण्यावर लक्ष दिले जात आहे.
रिलायन्स कंज्युमर वतीने या डीलसंदर्भात कोणती अधिकृत माहिती देण्यात आली नाही. ऑर्गनाइज्ड आणि अनऑर्गनाइज्ड इंडस्ट्री प्लेयर्समधील वाढती स्पर्धा आणि घटलेली बाजाराच्या हिस्सेदारी दरम्यान रावळगावने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे. रिलायन्स रिटेल ही वेगाने वाढणारी कंजुमर गुड्स आर्म आहे. याआधी आरसीपीएलने गुजरातमधील कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक आणि ज्यूस बनवणारी सोस्यो हजूरी बेवरेजेज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 50 टक्के भागीदारी घेतली आहे.
Reliance acquires Ravalgaon Chocolate brands
Reliance acquires Ravalgaon Chocolate brands
Reliance acquires Ravalgaon Chocolate brands
Reliance acquires Ravalgaon Chocolate brands
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements