देशभरातील विविध शहरांतून रेल्वे सेवा
श्रीरामजन्मभूमी असलेल्या अयोध्येमध्ये मुख्य मंदिर आणि मंदिर परिसरातील बांधकाम, सुशोभीकरणाचं काम वेगात सुरू आहे. देशातील आणि जगातील कोट्यवधी भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी आतूर आहेत. राम मंदिराच्या उदघाटनाची तयारी सुरू झाली आहे. मुख्य मंदिरासह रामपथ, भक्तीपथ आणि सुग्रीव किल्ल्याभोवती सुशोभीकरणाचं कामही अंतिम टप्प्यात आलं आहे. 22 जानेवारीला रामनगरीत प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. राम मंदिराच्या उदघाटनासाठी भारतीय रेल्वे देखील सज्ज आहे. देशातील विविध ठिकाणांपासून थेट अयोध्येपर्यंत रेल्वेही धावणार आहेत. त्यामुळे बेळगाव, हुब्बळी, बेंगळुरु, मंगळूरु, पुणे, मुंबई नागपूरमधून थेट अयोध्येला जाणारी रेल्वे आता भाविकांना मिळू शकेल (Belgaum to Ayodhya Railway Ayodhya Flight).
कर्नाटकला अयोध्येसाठी 11 विशेष ट्रेन मिळण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीपासून कर्नाटकला अयोध्येसाठी 11 विशेष ट्रेन मिळण्याची शक्यता आहे. यापैकी 3 गाड्या बेंगळुरु येथून, प्रत्येकी 3 हुब्बळी, म्हैसूर आणि मंगळूरु येथून आणि प्रत्येकी एक शिवमोग्गा आणि बेळगाव येथून सुटतील. अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात आलेल्या रेल्वे स्टेशनमध्ये प्रवाशांच्या प्रत्येक सुविधेची काळजी घेतली जाणार आहे. आधुनिक वास्तुकलेचा वापर करून बांधण्यात आलेल्या स्टेशनच्या इमारतीवर राम मंदिराशी संबंधित चित्रे रेखाटण्यात आली आहेत. या स्टेशनमध्ये प्रवाशांना सर्व आधुनिक सुविधा मिळणार आहेत. देशाच्या विविध भागांतून अयोध्येपर्यंत डझनभर ट्रेन सुरू करण्याचा विचार भारतीय रेल्वे मंत्रालय करत आहे.
अयोध्येत येणाऱ्या पर्यटकांच्या गटांना चार्टर्ड सेवा म्हणून काही गाड्या बुक करण्याचा पर्यायही रेल्वे देणार आहे. जेव्हा मोठ्या संख्येने यात्रेकरू अयोध्येला येतील, तेव्हा आयआरसीटीसीच्या मदतीने तिकिटिंग पीएसयू सह 10 ते 15 दिवसांच्या काळासाठी 24 तास केटरिंग सेवेची व्यवस्था रेल्वे करणार आहेत. ही मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही लावले जाणार आहेत. या सर्व कामाला रेल्वे प्रशासनाकडून अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. 19 जानेवारीनंतर अयोध्येपर्यंत जाण्यासाठी ट्रेनची सुविधा सुरू केली जाईल.
प्रवाशांना सर्व सुविधा देण्यासाठी अयोध्या स्टेशनला नवीन रूप देण्यात आलं आहे. या स्टेशनवर फूड कोर्ट, एसी वेटिंग लाउंज, एस्केलेटर, लिफ्ट, वाय-फाय अशा सुविधा असतील. याशिवाय, प्रवासादरम्यान आयआरसीटीसी प्रवाशांना 24 तास केटरिंग सेवा देखील प्रदान करेल. शरयू नदीवरील इलेक्ट्रिक कॅटामारन राइड देखील प्रवाशांसाठी एक नवीन आकर्षण असेल. राम मंदिराच्या उदघाटनाबाबत भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वीच मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत येत आहेत. विशेषत: रामलल्लाच्या नवीन संकुलाचे काम पाहण्यासाठी महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहारमधून जास्त भाविक येत आहेत. माध्यमांशी संवाद साधताना भक्तांनी सांगितलं की, रामाची अयोध्या पुन्हा उभी राहत असल्याचं बघणं ही मोठी बाब आहे. त्यामुळेच देशभरातून मोठ्या संख्येने लोक येथे येत आहेत. मंदिराच्या उदघाटनानंतर ही संख्या चौपट होईल आणि दररोज एक लाख भाविक अयोध्येत येतील अशी शक्यता आहे.
Ram Mandir Belgaum to Ayodhya Railway Station
Ram Mandir Belgaum to Ayodhya Railway Station
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements