R Ashwin withdraws from third Test due to family medical emergency
IND vs ENG 3rd Test : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. राजकोट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या कसोटी कारकिर्दीतील 500 वी विकेट घेणारा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन यापुढे या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. कौटुंबिक कारणामुळे अश्विनने या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे.
अश्विनने दुसऱ्या दिवशी सलामीवीर जॅक क्रॉलीला बाद करून कसोटी सामन्यात 500 बळी घेण्याचा पराक्रम केला. ही कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. जय शाह म्हणाले, ‘कौटुंबिक कारणामुळे आर अश्विनला तत्काळ कसोटी संघातून बाहेर करण्यात आले आहे. या कठीण काळात भारतीय बोर्ड त्याच्यासोबत आहे. चॅम्पियन क्रिकेटर आणि त्याच्या कुटुंबाला बीसीसीआय सपोर्ट करते. खेळाडू आणि त्यांच्या प्रियजनांचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. बोर्डाने अश्विन आणि त्याच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती केली आहे. कारण तो सध्या या आव्हानात्मक काळातून जात आहे.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सोशल मीडियावर अश्विनच्या आईला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राजीव शुक्ला यांनी सांगितले की, अश्विन राजकोटहून चेन्नईला परतला आहे. आर अश्विनच्या आधी स्टार फलंदाज विराट कोहली संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. विराटही वैयक्तिक कारणांमुळे या मालिकेचा भाग नाही. बीसीसीआय 37 वर्षीय आर अश्विनसोबत आहे. मंडळाने लोकांना अश्विनची गोपनीयता पाळण्याचे आवाहनही केले आहे.
R Ashwin withdraws from third Test
R Ashwin withdraws from third Test
R Ashwin withdraws from third Test
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310