व्हिडिओ समोर आल्यानंतर गुन्हा दाखल
कर्नाटक—belgavkar : प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपावरून भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कुमठा येथे शनिवारी बोलताना त्यांनी धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केले होते. कलम १५३ अ ५०५ अन्वये स्वेच्छेने गुन्हा दाखल करण्यात आल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक एन. विष्णुवर्धन यांनी सांगितले.
हेगडे यांनी कुमठा येथे भटकळ येथील प्रार्थनास्थळांबाबत (मशिद) प्रक्षोभक वक्तव्ये केली (बाबरी मशिदीप्रमाणे भटकळ मशिदीचा विध्वंस निश्चित). तसेच मुख्यमंत्र्यांच्या अयोध्येतील सोहळ्याबाबतच्या भूमिकेवरही टीका केली होती (भटकळ मशिदीच्या विध्वंसाबद्दल वादग्रस्त विधान केले). याबाबतचा व्हिडिओ समोर आल्यानंतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आंदोलन केले. यानंतर कुमठा पोलिसांनी द्वेषयुक्त भाषण आणि जिल्ह्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Case against BJP MP Anant Kumar Hegde over controversial remark on Bhatkal mosque Karnataka
Police FIR MP Anant Kumar mosque Karnataka
Police FIR MP Anant Kumar mosque Karnataka
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310