Board of Control for Cricket in India (BCCI) भारतीय क्रिकेटपटूंना एक मेसेज पाठवण्याच्या तयारीत आहे. जे आता सध्या भारतीय संघाचा भाग नाहीत किंवा रणजी ट्रॉफीसारख्या महत्त्वाच्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळत नाहीत. बोर्ड अशा खेळाडूंवर नाराज आहे आणि लवकरच त्यांच्याविरुद्ध आदेश जारी करू शकतात. या यादीत यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनचे नाव आघाडीवर आहे (Play Ranji Trophy unless on national duty or injured – BCCI takes strict steps amid Ishan Kishan saga).
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात इशानने अचानक ब्रेक मागितला होता, त्यानंतर तो सातत्याने क्रिकेटपासून दूर जात आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणाले की, किशनला संघात परतायचे असेल तर त्याला रणजी ट्रॉफी क्रिकेट खेळावे लागेल. मात्र, इशानने अद्याप एकही रणजी सामना खेळलेला नाही. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, इशान किशनने पांड्या ब्रदर्ससोबत सराव सुरू केला आहे. म्हणजे तो रणजी ट्रॉफीसाठी नाही तर आयपीएलसाठी तयारी करत असल्याची अटकळ बांधली जात होती. अशा परिस्थितीत रणजी ट्रॉफीदरम्यान खेळाडू आयपीएल मोडमध्ये आल्याने बीसीसीआय प्रचंड संतापले आहे.
बीसीसीआयच्या जवळच्या सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, “पुढील काही दिवसांत सर्व खेळाडूंना रणजी ट्रॉफीमध्ये त्यांच्या राज्य संघाकडून खेळण्यासाठी बीसीसीआयकडून कळवले जाईल, आणि NCA मध्ये बरे होत आहेत त्यांना सूट देण्यात येणार आहे. कोणत्याही खेळाडूंची नावे स्पष्टपणे उघड करण्यात आली नसली तरी, जानेवारीपासून आयपीएल मोडमध्ये आलेल्या काही खेळाडूंबद्दल बोर्ड फारसे खूश नाही. मात्र, बीसीसीआयने कोणत्याही वैयक्तिक खेळाडूचे नाव उघड केलेले नाही. पण हा मेसेज इशान किशनबाबत असल्याचे मानले जात आहे. खरे तर काही काळापूर्वी प्रशिक्षक राहुल द्रविडने इशान किशनला स्थानिक स्पर्धेत धावा करण्यास सांगितले होते, परंतु त्याने या सूचनेकडे दुर्लक्ष केले.
Play Ranji Trophy BCCI Ishan Kishan saga
Play Ranji Trophy BCCI Ishan Kishan saga
Play Ranji Trophy BCCI Ishan Kishan saga
Play Ranji Trophy BCCI Ishan Kishan saga
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310