इराणने मंगळवारी पाकिस्तान आणि इराकवर क्षेपणास्त्र हल्ले केले. त्याविरोधात पाकिस्तानने इराणला युद्धाचा इशारा दिला होता. तसंच, इराणने हद्दीचे उल्लंघन करून कुरापत काढली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया पाकिस्तानने दिली होती. आता पाकिस्तानने इराणवर प्रतिहल्ला केला आहे. त्यामुळे, हमास-इस्रायल युद्धानंतर आता पाकिस्तान-इराण यांच्यात युद्ध पेटणार का असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे (Pakistan conducts retaliatory strikes in Iran’s Siestan-Balochistan province).
इराणने मंगळवारी पाकिस्तानातील जैश एल अदिल या बलुस्थान प्रांतातील दहशतवादी गटाच्या दोन तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. त्यात दोन मुलांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. त्यानंतर पाकिस्तानने इराणला गंभीर परिणामांचा इशारा दिला आणि इराणमधील आपल्या राजदूतांना त्वरित माघारी बोलावले. इतकेच नव्हे तर दोन्ही देशांतील नियोजित द्विपक्षीय कार्यक्रम आणि दौरेही त्वरित रद्द केले.
पाकिस्तानच्या दाव्यानंतर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. जैश-अल-उदल ही इराण आणि पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेली दहशतवादी संघटना असून २०२१ मध्ये या दहशतवादी गटाची स्थापना झाली. दरम्यान, पाकिस्ताननेही आता इराणवर हल्ला केला असून इराणच्या बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मीवर लक्ष्य केलं आहे. पाकिस्तानने इराणवर २० क्षेपणास्रे डागली असल्याचं वृत्त आहे.
Pakistan on Thursday said that the country’s air force struck terrorist hideouts in Iran’s Siestan-Balochistan province, a day after Islamabad recalled its ambassador from Tehran in the wake of Iranian missile and drone strikes in Balochistan.
Pakistan conducts retaliatory strikes in Iran
Pakistan conducts retaliatory strikes in Iran
Pakistan conducts retaliatory strikes in Iran
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements