National Highways Authority of India (NHAI) has hiked the toll charges
NHAI hikes tolls across highways by 5%
बेळगाव—belgavkar—belgaum : खानापूर : खानापूर-बेळगाव मार्गावरील गणेबैल टोलनाक्यावर टोल शुल्कात वाढ करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी लोकांनी स्थानिकांना टोलमाफी लागू करावी या मागणीसाठी आंदोलन केले होते. याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन टोल व्यवस्थापनाने दिले होते. त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नसताना पुन्हा टोलवाढ करण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
टोल प्रशासनाचा सुरवातीपासूनच मनमानी कारभार सुरु आहे. महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण व समाधानकारक भरपाई देऊन मगच टोल वसुली सुरु करावी. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी टोलला विरोध केला होता. हा विरोध चिरडून टाकत प्रशासनाला हाताशी धरुन अन्यायकारक टोल वसुली सुरु करण्यात आली. शेतकऱ्यांचे भरपाईचे दावे वर्षभरात निकालात काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याचीही अद्याप पूर्तता झालेली नाही. नियमानुसार स्थानिकांना टोलमधून सूट देणे आवश्यक असताना त्याचीही अंमलबजावणी होत नाही. याबाबत आंदोलन छेडून शेतकरी व स्थानिकांना टोल माफी द्यावी अशी मागणी करण्यात आली. त्याची पूर्तता करण्याचे आश्वासनही हवेत विरले आहे.
सध्या चार चाकींसाठी 10 रुपये, कमी वजनाच्या वाहनांसाठी 20 रुपये, बससाठी 30 रुपये, ट्रकसाठी 45 रुपये, अवजड वाहनांना 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. निवडणूक संपताच टोल शुल्कात केलेली वाढ अन्यायकारक आहे. टोलवाढ करण्यासाठी भाजपचे नेते निवडणूक संपण्याची वाट पाहत होते का? शेतकऱ्यांसह स्थानिक प्रवाशांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी भाजपच्या नूतन खासदार व आमदारांनी याकडे लक्ष द्यावे. विनायक मुतगेकर, अध्यक्ष, ग्राम पंचायत युनियन
NHAI hikes tolls across highways
NHAI hikes tolls across highways
NHAI hikes tolls across highways
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements